तुलसी महाविद्यालय बीड येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
 

बीड

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै २०२३ रोजी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ.एल. एम.थोरात यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत उपस्थित विद्यार्थ्यांना अण्णाभाऊंच्या जीवन प्रवासाविषयी माहिती सांगितली.

यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ.एल. एम.थोरात सांगितले की दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या आणि गाणी लिहिली आहेत.
मराठी साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरिचित आहेत. ‘माणूस’ हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे.त्यांच्या साहित्यातून त्यांनी वंचित आणि उपेक्षित समाजाच्या तळागाळातील जातीजमाती, सवर्ण आणि दलित माणसांचे जीवन मांडले आहे. त्याला वास्तवतेची धार आहे. त्यांचे साहित्य बंड, क्रांती आणि विद्रोहाची विचारशलाका आहे असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख सुरेश कसबे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा