बिंदुसरा नदीपात्रातील धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत बांधकाम प्रकरणात विभागीय आयुक्तांचे कार्यवाहीचे दुस-यांदा आदेश:- डॉ. ढवळे




बिंदुसरा नदीपात्रातील धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत बांधकाम प्रकरणात विभागीय आयुक्तांचे कार्यवाहीचे दुस-यांदा आदेश:- डॉ.गणेश ढवळे

बीड

शहरातील फुलाई नगर मधील बिंदुसरा नदीपात्रात बीड नगर परिषद सर्व्हे नंबर १९२ तरफ खोड मधील प्लॉट क्रमांक एच नगरपरिषद मालमत्ता क्रमांक जुना २-९-४८५ व नविन मालमत्ता क्रमांक २-९-४८७ मधिल कालिंदेश्वर महादेव मंदिराच्या जागेवर अतिक्रमण प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “प्रतिकात्मक शिवलिंग पुजन आंदोलन”करण्यात आले होते.या निवेदन अनुषंगाने सहाय्यक आयुक्त गट अ नगरपरिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद डॉ.निलम पाटील यांनी दि.२९ मे आणि दि.८ जुन रोजी दोन वेळा मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांना बिंदुसरा नदीपात्रात भराव घालून नदीपात्राचे मैदान करून ओढे चक्क बुजवून नदीचा प्रवाह वळवुन करण्यात आलेल्या अनाधिकृत बांधकाम प्रकरणात ठोस कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.

मुख्याधिकारी निता अंधारे याचा तहसिल प्रशासनाने कार्यवाही करावी म्हणत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातातील पुर क्षेत्रातील अनाधिकृत बांधकाम प्रकरणात विभागीय आयुक्त कार्यालयाने मुख्याधिकारी नगरपरीषद बीड यांना आदेशित केलेले असताना मुख्याधिकारी नगरपरीषद बीड नीता अंधारे यांनी तहसीलदार बीड यांना नागरी भागातील शासकीय,पड,गायरान,जमीनीची मालकी ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाने त्या जमिनीवर झालेले अतिक्रमण काढावे असे नमूद करत शासकीय जमिनीच्या बाबतीत संबंधित तलाठी,मंडळ अधिकारी,वन जमिनीच्या बाबतीत स्थानिक वन अधिकारी गायरान व सार्वजनिक जमिनीच्या बाबतीत संबंधित ग्रामसेवक व अन्य प्रकरणात शासकीय जमीन ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद देण्याची दक्षता घ्यावी असे नमूद करत डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार बिंदुसरा नदीपात्रात झालेले बांधकाम हि निष्कासित करण्याची प्राथमिक जबाबदारी तहसिल कार्यालयाची असुन त्या कार्यालयामार्फत निष्कासित करणे योग्य होईल आणि या कार्यवाही करता कार्यालयाचे सर्व यंत्रणा आपण सुचवलेल्या दिनांकास उपलब्ध करून देण्यात येईल असे लेखी दिले आहे.एकंदरीतच जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा