बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे आज नाशिक,बीडच्या दौऱ्यावर
बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे आज नाशिक,बीडच्या दौऱ्यावर

केज प्रतिनिधी : बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे आज (दि.२४) जुलै २०२३ पासून नाशिक बीडच्या दौऱ्यावर (दि.२४) सकाळी १०:०० वाजता नाशिकरोड उद्घाटन त्यानंतर ११:०० वाजता पिंपळगाव मार्गे देवळा येथे बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थित.कळवण येथे दु.१२:०० वाजता शाखेचे उद्घाटन मार्गदर्शन व प्रमुख पाहुण्याचा सत्कार शुभारंभ होईल.नाशिक येथील शासकीय विश्रामगृह मध्ये विविध विषयांवर चर्चा त्यानंतर बीडकडे रवाना ४ ते ५ च्या सुमारास बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते सोबत बैठक व मुक्काम. त्यानंतर (दि.२५) जुलै २०२३ रोजी
सकाळी ०९:०० वाजता गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथे मातंग समाजातील युवकावर प्राण घातक हल्ला झालेल्या कुटुंबाची भेट,११:०० वाजता हॉस्पिटलमध्ये अन्यायग्रस्त उपचार घेत असलेल्या कार्यकर्त्याची भेट घेऊन पुढील नियोजन बैठकीसाठी केज कडे रवाना होतील.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सवानिमित्ताने दु. ०२:०० वाजता केज येथे रमेश तात्या गालफाडे सामाजिक प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते सोबत बैठक, त्यानंतर दु.०३:०० वाजता शासकीय विश्रामगृह केज येथे पत्रकार परिषद व पुढील नियोजित कार्यक्रमासाठी पुणेकडे रवाना होतील.अधिक माहिती साठी ९०११९९३७०० हा संपर्क देण्यात आला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा