मुळुकवाडी येथे दिवसाच दूसरीची चोरीची घटना
मुळुकवाडी येथे दिवसाच दूसरी चोरीची घटना

दासु ढास यांच्या घरी चोर

रविवार दि.३० जुलै रविवार रोजी बीड तालुक्यातील मौजे मुळुकवाडी येथील दासु भिमराव ढास वय ६० वर्षे यांच्या राहत्याघरी चोरी झाली.
रानात काम करून सायंकाळी ७ वाजता घरी आले असता घराचे कुलूप तोडल्याचे दिसुन आले.आतमधील सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसुन आले. नेकनुर पोलिस स्टेशनचे पी.आय.विलास हजारे ,पोलिस उपनिरीक्षक अजय पान पाटील व लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.हे. संतोष राऊत घटनास्थळी दाखल.

रोख रक्कम ५० हजार व काही सोने चोरीला गेल्याचे दासु ढास व मंडुबाई ढास यांनी पोलिसांना सांगितले.पोलिसांनी जवाब घेतला असुन पुढील तपास करत आहेत.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा