पत्रकार धनराज पवार यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल “राष्ट्रीय छावा रत्न’ पुरस्कार जाहीर
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते सन्मानित

जामखेड प्रतिनिधी

पिडीत, वंचिताच्या प्रश्नांनाना वाचा फोडणारे तसेच अल्पावधीतच आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत प्रशासन त्वरित दखल घेत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे युवा पत्रकार यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल ” राष्ट्रीय छावा संघटना यांच्या वतीने ” राष्ट्रीय छावा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ,अशी माहिती छावा संघटना चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांनी पत्राद्वारे कळवले. राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने दरवर्षी संघटनेच्या वतीने
सामाजिक, पत्रकारिता, वैद्यकीय, अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतो.
या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजितदादा पवार यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. तर या पुरस्काराबद्दल प्रा मधुकर राळेभात, प्रदीप टापरे, नगरसेवक अमित चिंतामणी,,सागर सदाफुले, अमित जाधव,प्रा लक्ष्मण ढेपे, डॉ.संजय भोरे, अमित गंभीर, प्रकाश काळे,आनंद राजगुरू,सरफराज पठाण, गौतम दादा बाफना,मोहसीन सय्यद,नासीर सय्यद,गळगटे सर,गणेश शेठ डोंगरे,
अशोक आव्हाड,प्रा राहुल आहिरे, अमोल गिरमे,अमोल लोहकरे, सुरेश मोहिते,प्रताप पवार, संजय आरेकर, गफ्फारभाई पठाण,अभय शिंगवी, लक्ष्मी पवार, विजय कुलकर्णी, उपेंद्र आढाव, लखन मिसाळ तसेच तालुक्यातून व राज्यातून युवा पत्रकार धनराज पवार यांचे अभिनंदन होत आहे

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा