अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना केज पोलीस आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या माणुसकीचे दर्शन !




केज ! प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे वरपगाव रस्त्या लगत उसाच्या बांधावर एक ४० ते ४५ वयाच्या पुरुष जातीचे अनोळखी मृतदेहाची आढळून आले होते. त्याची ओळख न पटल्याने केज पोलीस आणि नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अंतिम संस्कार करताना सर्व प्रथा व रितिरिवाज प्रमाणे सर्व विधी पार पाडून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले.

या बाबतची माहिती अशी की, दि. १५ मे रोजी केज तालुक्यातील चिंचोली माळी शिवारात वरपगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिमेला रस्त्यापासून सुमारे २०० मिटर अंतरावर हरिभाऊ गायकवाड आणि सुधाकर गायकवाड यांच्या गट न. २१५ यांच्या सामायिक बांधावर एक ४० ते ४५ वर्ष वयाचे पुरुष जातीचे प्रेत आढळून आले होते.

दरम्यान प्रेताची ओळख न पटल्याने केज पोलिसांनी पंचनामा करून प्रेताची उत्तरीय तपासणी केली. नंतर केज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्या नंतर केज पोलिसांनी केज नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या अनोळखी मृतदेहावर क्रांतीनगर, कानडी रोड लगतच्या सार्वजनिक स्मशाभूमीत सर्व विधी पूर्ण करून पुष्पहार व पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व अंतिम संस्कार केले.

पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे,अमोल गायकवाड, अशोक गवळी, सचिन अहंकारे, ढाकणे, शेख खुदबू, आझाद शेख, अमर हजारे, ढाकणे, थोरात , गौतम बचुटे हे उपस्थित होते.

या बद्दल केज पोलीस आणि नगरपंचातचे कर्मचारी , गृहरक्षक दलाचे जवान व अंत्यविधीस सहकार्य करणारे यांचे कौतुक होत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा