विधवांसाठी मदतनीस पदभरती मधुन अर्ज माघार




विधवांसाठी मदतनीस पदभरती मधुन अर्ज माघार

बाबुलतारा येथील युवक दादासाहेब तौर,अशोक तौर यांचा सर्व समाजापुढे आदर्श

गेवराई 

जिल्ह्यात अंगणवाडी पदभरती चालू असून गेवराई तालुक्यातील बाबुलतारा या गावात अंगणवाडी मदतनीस या पदाची जागा रिक्त होती. या गावातून बरेच अर्ज दाखल करण्यात आले होते. यादी मध्ये विधवा महिला शशीकला तौर यांनी अर्ज दाखल केला होता परंतु शासन नियमानुसार त्यांचा नंबर तीन वर होता.मनाचा मोठेपणा दाखवत बाबुलतारा येथील युवक दादासाहेब तौर,अशोक तौर यांनी आप आपसात विचार विनिमय करून अर्ज परत घेऊन विधवा महिलेची निवड केली. बाबुलतारा येथील युवक दादासाहेब तौर,अशोक तौर यांनी बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात एक आदर्श असे कार्य केले आहे. विधवा महिलेच निवड व्हावी या आदर्श कार्याबद्दल बाबुलतारा येथील युवक दादासाहेब तौर,अशोक तौर विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे

बाबुलतारा येथिल उमेदवारांचे आदर्श उपक्रम पाहून बालविकास प्रकल्प अधिकारी मा. श्री. रामेश्वर मुंडे साहेब यांनी दोन्ही उमेदवार श्रीमती रुपाली दादासाहेब तौर व श्रीमतीअर्चना अशोक तौर यांचा सत्कार केला. याप्रसंगी श्री. आघाव साहेब विस्तार अधिकारी, श्री. महंमद जुबेर कनिष्ठ सहाय्यक, संजय पवार,दादासाहेब तौर,अशोक तौर,शहादेव तौर, अनिरूद्ध तौर, सुरेश तौर उपस्थिती होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा