शासनाच्या योजनांचा गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही पुढाकार घ्यावा – धनंजय मुंडे
 

शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो लाभार्थ्यांना विविध योजनेतील लाभाचे वितरण

महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी परळीत जागा उपलब्ध करून देणार – धनंजय मुंडे

मराठवाड्याचा स्वातंत्र्य संग्राम घराघरात पोचवुन पुढच्या पिढीला तो कळावा – धनंजय मुंडे

महसूल सप्ताहाचीही सांगता

परळी वैद्यनाथ (दि. 06) – केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी अत्यंत लाभदायक आहेत; प्रशासनाच्या बरोबरीने या योजनांचा लाभ गरजूंना मिळावा यासाठी गाव व शहर पातळीवर स्थानिकच्या सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घेतल्यास खऱ्या गरजूंपर्यंत प्रभावीपणे योजनेचे लाभ पोचतील, त्यामुळे योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राजकीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना केले आहे.

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकत्रित देण्याचा कार्यक्रम आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी वैद्यनाथ येथे आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी श्री. मुंडे बोलत होते.

परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यात शासनाच्या विविध घरकुल योजना, स्व.गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, विविध विषेश सहाय्य योजना, कृषी विभागाच्या योजना आदी सर्वांच्या माध्यमातून लाभ मिळालेल्या व मिळत असलेल्या लाभार्थींची संख्या फार मोठी आहे. या योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी होणे अत्यंत आवश्यक आहे व ती सर्वांची व्यापक जबाबदारी आहे त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील पक्षपात किंवा राजकारण यामध्ये येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, कारण लाभ देणारे प्रामाणिक असल्यावरच योजना यशस्वी ठरतात; असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

महिलांच्या सक्षमीकरण घोरणात बचत गटांचे महत्वाचे स्थान आहे, महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी विशेष जागा उपलब्ध व्हावी यादृष्टीने परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत दीड हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

*मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव*

दरम्यान यावर्षी मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात अनेक वीरांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिलेले आहे त्या सर्वांचे स्मरण करून मराठवाड्याचा स्वातंत्र्याचा जाज्वल्लेषा इतिहास घराघरात पोहोचावा व पुढील पिढीला ही तो कळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

कार्यक्रम स्थळी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष 2023 निमित्त दुर्मिळ व ऐतिहासिक अशा पुस्तक व चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते याचेही उद्घाटन धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे यांनी केले तसेच जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ – मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हाध अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार संदीप पाटील, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, वैद्यनाथ कारखान्याचे वाईस चेअरमन चंद्रकांत कराड, ऍड. गोविंदराव फड, संजय जाधव, बालाजी मुंडे, दीपक देशमुख, माऊली मुंडे, माऊली तात्या गडदे, डॉ. राजाराम मुंडे, संजय आघाव, माऊली पाटील, विनायक राठोड, प्रकाश कावळे, श्रीकांत फड, शिरीष नाकाडे, नितीन काकडे, शकील कच्ची, बंडू गुट्टे, रवी मुळे, सुभाष नाटकर, अक्रम पठाणझ वैजनाथ कदम यांसह आदी उपस्थित होते.

या योजनांचा देण्यात आला लाभ

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत 211 महिला बचत गटांना पाच कोटी तीन लक्ष रुपये अर्थसहाय्य

जिल्हा वार्षिक योजनेतून परळी तालुक्यातील अंगणवाड्यांना स्मार्ट टीव्ही चे वितरण

अंगणवाडी बालकांना बेबी किटचे वाटप

रमाई आवास नागरी घरकुल योजनेतील लाभार्थींना 50000 चा हप्ता धनादेश वितरण

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत 270 ऊसतोड कामगारांना नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप

आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेतील लाभांचे वितरण

याचबरोबर पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, शहरी महिला बचत गटांना पत्रपरिचय बोर्डाचे वाटप, कृषी अभियांत्रिकी योजनेतून पाच ट्रॅक्टर व एका रोटावेटरचे वाटप, सलोखा योजनेतील लाभार्थ्यांना फेरफार प्रमाणपत्राचे वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीचे वितरण तसेच यावेळी परळी तालुक्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या खतांचा साठाही खुला करून देण्यात आला. बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महसूल सप्ताहाची ही आज सांगता झाली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा