एकसाथीने साहेबांची सभा यशस्वी करु -आ.संदीप क्षीरसागर
एकसाथीने साहेबांची सभा यशस्वी करु -आ.संदीप क्षीरसाग

दोन दिवस मतदारसंघ, नंतर जिल्हाभर बैठका

बीड

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. ते स्वतः आपल्या जिल्ह्यात येत आहेत. ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पवार साहेबांची सभा आपण एकसाथीने, एकसोबतीने आपण यशस्वी करू असे आ.संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत निश्चय केला.
           राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार १७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी आ.क्षीरसागर आता कामाला लागले आहेत. सोमवारी (दि.७) रोजी मांजरसुंबा येथील कन्हैया हॉटेलमध्ये येळंबघाट,नेकनूर,मांजरसुंबा, लिंबागणेश, चौसाळा, बोरखेड, पाली पंचायत समिती गणातील तर राजुरी (न.) येथील श्री मंगलमुर्ती देवस्थान च्या सभागृहात राजुरी (न.), कामखेडा, चर्‍हाटा या पंचायत समिती गणातील  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. पहिले दोन दिवस बीड मतदारसंघात व नंतर संपूर्ण जिल्ह्यात सभेच्या तयारीसाठी, आ.संदीप क्षीरसागर बैठका घेणार आहेत.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा