मुख्यमंत्री केसीआर यांचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी/स्वीय सहाय्यक शरदजी मरकड यांनी दिली बीआरएस बीड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास भेट




बीड
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रासाठी नेमलेले सेक्रेटरी/ स्वीय सहाय्यक श्री.शरदजी मरकड यांनी बी आर एस चे जिल्हा समन्वयक दिलीप अण्णा गोरे यांच्या जनसंपर्क संपर्क तथा बीड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास काल हैदराबाद येथे जात असताना भेट दिली.
यावेळी जिल्हा बी आर एस च्या वतीने जिल्हा समन्वयक दिलीप अण्णा गोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री शरद जी मरकड हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी चे भूमिपुत्र असून विद्यार्थी दशेपासून शरदराव मरकड यांनी शेतकरी संघटनेमध्ये खूप मोठे काम केले असून महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती असताना एक हजार जनावरणची छावणी उभा केली होती. या छावणीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी त्यांच्या छावणीस भेट दिली होती. सामान्य कुटुंबात जन्मलेले शरद मडकर यांना शेतकरी वर्गांची खूप मोठी साथ असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव साहेबांनी त्यांना आपले खाजगी स्वीच सहायक म्हणून नियुक्त करून घेतले असून तेलंगाना सरकारच्या सर्व सुविधा त्यांना मिळत आहेत. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्र संघटनाची जबाबदारी आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोकराव पांढरे युवा नेते दिग्विजय गोरे, रामप्रसाद कोल्हे, देविदास गुंजाळ, श्याम पिंपळे राम परजणे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा