पुरूषोत्तमपूरीत भाविक गोदावरीत बुडाला




पुरूषोत्तमपूरीत जालना जिल्ह्यातील भाविक गोदावरी च्या पाण्यात बुडाल

शोधकार्य सुरू

घटनास्थळी, तहसीलदार व माजलगाव ग्रामीण पोलीस दाखल

माजलगाव ( ज्योतीराम पाढंरपोटे ) तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे सध्या अधिक मास असल्याने पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भारतभरातून भावीक भक्त येतात. पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदी वाहते या नदीमध्ये आंघोळ करून भाविक भक्त दर्शन घेतात आंघोळ करत असताना जालना जिल्ह्यातील एक भक्त गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाला असल्याची माहिती स्थानिक लोंकानी दिली आहे. यावेळी,माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे दाखल झाले आहेत बुडालेल्या व्यक्तीचा शोध कार्य चालू आहे.

याविषयी माहिती अशी आहे की मारुती खवले वय ४५ वर्षं राहणार पाटोदा तालुका परतुर जिल्हा जालना हे आज दि ११ ऑगस्ट शुक्रवार रोजी आपल्या नातेवाईका सोबत पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आले होते ते गोदावरी नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडाले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे ही,घटना शुक्रवार रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे बुडालेल्या व्यक्तीचा स्थानिक लोक शोध घेत असून यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी व तहसीलदार वर्षा मनाळे घटनास्थळी दाखल झाले आहेत शोध कार्य चालू असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा