चकलांबा पोलिसांची वाळू तस्करा  विरोधात  दबंग कारवाई  चार आरोपी ताब्यात 84 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
चकलांबा पोलिसांची वाळू तस्करा  विरोधात  दबंग कारवाई
 चार आरोपी ताब्यात 84 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.
गेवराई / प्रतिनिधी
 चकलांबा पोलिसांची वाळू तस्करा  विरोधात  दबंग कारवाई करत चार आरोपीना ताब्यात घेत 84 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.
 ठाणेदार नारायण एकशिंगे यांचा वाळू तस्करांनी तसेच अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलाच घेतला धाक निर्माण झाला आहे.
    पो.स्टे.चकलांबा हद्दीत मौजे राक्षसभुवन येथील गोदावरी नदी पात्रात गणपती मंदिरा समोर दोन हायवा मध्ये चार लोडर ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रातील वाळुचा अवैधरित्या उपसा करुन तिची चोरटी वाहतुक करित आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी दि. 12 शनिवार रोजी  सकाळची 08.10 वाजे दरम्यान छापा मारला आसता गोदावरी नदी पात्रात चार लोडर (ट्रॅक्टर) हे नदीपात्रातील वाळुचा अवैधरित्या उपसा करुन दोन हायवा मध्ये भरत असताना मिळुन आले. तेंव्हा रेडपार्टीतील चौघांनी दोन हायवा व दोन लोडर (ट्रॅक्टर) चालक यांना जागीच पकडले सदर कारवाई करीत असतांना, नदी पात्रातुन वाळुचा उपसा करीत असलेले ईतर दोन लोडर ट्रॅक्टर हे पोलिसांना पाहुन पळुन गेले. टीप्पर क्र. एमएच 15 एफव्ही 6390 च्या चालकास नामे शेरखाँ बाबु पठाण वय( 35 वर्षे) रा. घोडका राजुरी ता.जि.बीड, हायवा क्र
एमएच 44 9132 चा चालक नामे शेख साबेर शहाबुद्दीन वय (22 वर्षे)  रा.नांदुर हवेली ता. जि. बीड, लोडर ट्रॅक्टर क्र. एमएच 23 बीएच 1486 चा चालक नामे प्रदिप अंकुश पोटफोडे वय (30 वर्षे) रा.राक्षसभुवन ता.गेवराई, लोडर ट्रॅक्टर क्रमांक. एमएच 21 बीव्ही 4845 चा चालक त्याचे नाव महेश भालचंद्र कोंढरे वय (35 वर्षे) रा. राक्षसभुवन ता. गेवराई जि.बीड यांना ताब्यात घेतले आहे. तर दोन लोडर ट्रॅक्टर पळुन नेलेल्या  चालकांचे नाव अजय सखाराम कोंढरे व  बाळासाहेब तात्यासाहेब नाटकर दोन्ही रा. राक्षसभुवन ता. गेवराई असे असल्याची माहिती चकलांबा पोलिसांनी दिली.  दोन भारत बेंझ कंपनीचे पिवळ्या रंगाचे हेड असलेला हायवा क्र. एमएच 15 एफव्ही 6390 आणि
एमएच  44 9132 व दोन
 लाल रंगाचे रोडर ट्रॅक्टर क्र. एमएच 23 बीएच 1486 आणि एमएच 21 बीव्ही 4845 असा एकुण 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन, सदरील आरोपी विरुध्द पो.स्टे. चकलांबा येथे गुरनं 228/2023 कलम 379,511,34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि अनंता तांगडे हे करीत असुन पळून गेलेल्या आरोपींचा व वरील गाड्यांच्या मुळ मालकांचा शोध घेवुन त्यांना अटक करणार असल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि नारायण एकशिंगे यांनी दिली.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधीकारी नीरज राजगुरु  यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नारायण एकशिंगे व सोबत पोउपनि अनंता तांगडे, पोह तिपाले, पोह अमोल येळे, पोअं खटाणे, पोअं पवळ यांनी  केली आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा