वंचित बहुजन आघाडीने अंदोलनाचा ईशारा देताच




वंचित बहुजन आघाडीने अंदोलनाचा ईशारा देताचं;
उमापूर – पंचाळेश्वर रोडवर मुरुम टाकुन खड्डे बुजवने सुरु.
गेवराई / प्रतिनिधी
 तालुक्यातील श्रीक्षेत्र पंचाळेश्वरला जाण्यासाठी हजारो भाविक उमापूर मार्ग निवडतात परंतु या रोडला अक्षरशः तलावाचे स्वरुप आले होते वाहनधारक व पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले होते. उमापूर – पांचाळेश्वर हा रोड तात्काळ दूरस्त करावा नसता वंचित बहुजन आघाडीच्यावतिने या रोडवरील चिखल पाण्यात उतरुन बेशरमाची रोपे लावून अंदोलन करु असा ईशारा वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर हवाले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला होता याची दखल घेत अखेर उमापूर – पांचाळेश्वर या रोडवर मुरुम टाकुन खड्डे बुजवने सुरु केले आहे.


 जिल्हा परिषद, विधानसभा, ग्रामपंचायत निवडणूकीच्यावेळी रस्ता डांबरी करुन देण्याचे  अश्वासन तालुक्यातील नेत्यांनी दिले मते मिळवून घेत विजयी झाले सत्ता भोगली परंतु मधल्या काळात या नेत्यांनी या रोडकडे ढुंकूनही पाहिले नाही. याच रोडवर बांडे, हिंगे,जाधव वस्ती, ठाकरवाडी आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी वस्तीवरील लोकांनी रोड करु देत नाहीत म्हणून मतदानावर बहिष्कार टाकला होता. तेंव्हा काही नेत्यांनी पांचाळेश्वर रोड डांबरी करण्याचे अश्वासन दिले होते, त्यानुसार वस्तीवरील मतदारांनी मते दिली परंतु नेत्यांनी शेवटी त्यांचा विश्वासघातच केला.
 पाऊसाळ्यात कोणतेही वाहन या रोडवरून चालवता येत नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांना पाच कि.मी चिखल तुडवत पायपिट करावी लागत असते. कोणी आजारी पडले तर त्या रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतांना मोठी कसरत करावी लागते, यामुळे बांडे, जाधव, हिंगे वस्ती, ठाकरवाडी मार्गे जाणाऱ्या श्रीक्षेत्र पंचाळेश्वर रोडचे तात्काळ काम करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या रोडवरील साचलेल्या पाण्याच्या तलावात बेशरमाची रोपे लावून अंदोलन करु असा ईशारा ज्ञानेश्वर हवाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला होता अखेर अंदोलनाच्या ईशाऱ्याची दखल घेत अंदोलनापूर्वीच रोडवर मुरुम टाकुन खड्डे बुजवने सुरु केले आहे अशी माहिती वंचितचे ता. प्रसिद्धीप्रमुख ज्ञानेश्वर हवाले यांनी दिली.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा