जवळा येथे चावडी वाचनाच्या माध्यमातून जनजाग्रुती




परंडा प्रतिनिधि
दि.15 ऑगस्ट रोजी देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन जवळा (नि.) ता.परांडा,जि. उसमानाबाद येथे उत्साहात साजरा करण्यात आला. अश्विनी अर्जुनराव जगदाळे  यांनी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जवळ (नि.) ता.परांडा.जि.उसमानाबाद येथे ग्रामसभेच्या चावडी वाचनामध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारसी) पूणे यांच्या निर्देशानुसार
“मी सारथीचा लाभार्थी” या सदरा खाली त्यांना मिळालेले सारथी चा लाभ, मार्गदर्शन विषयी माहीती दिली. व  छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारसी) पूणे या संस्थेबाबत महीता ,संस्थेचे उद्देश,तसेच  मराठा -कुणबी -कुणबी मराठा समाजातील दुर्लक्षित गटासाठी सारथीच्या विविध योजनांची माहिती उत्तमप्रकारे सांगीतली व या माहितीचा ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी ,महीला,शेतकरी,लघु,कुटीर उद्योजक याना सारथी मधील विविध योजनांचा लाभ होण्यासाठी वाचनाच्या माध्यमातून प्रोत्साहीत केले.या वेळी सरपंच सौ.शितल तानाजी वाघमारे,उपसरपंच रमेश कारकर,मुख्याध्यापिका सौ.शांता भातलवंडे,शिक्षीका सौ.संगिता कारकर, शिक्षक प्रभाकर चव्हाण व ग्रामस्त जेष्ठ नागरीक आदी उपस्थित होते. तसेत चावडी वाचनाच्या निमित्त     विविध योजनांचा लाभाविषयी माहीती दिया बद्दल अशविनी अर्जुनराव जगदाळे यांना ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच यांनी प्रमाणपत्र देऊन  सम्मानीत केले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा