कृषीकन्यांनी इन्फॉर्मेशन कॉर्नरचां उपक्रम कौतुकास्पद




 

बीड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत सौ. के. एस. के. ऊर्फ काकू कृषी महाविद्यालय बीड येथील विद्यार्थिनिंनी 21 ऑगस्ट रोजी गावात इन्फॉर्मेशन कॉर्नर हा उप्रकम राबवला. यामध्ये कृषीशास्त्र या विषया संबंधित साहित्य त्यामधे नांगर, कुळव, बैलगाडी, तुषार सिंचन, विळे,खुरपे, औत, असे वेगवेगळे साहित्य मांडून त्याबद्दल शेतकर्यांना माहिती सांगितली आणि यासोबत च फलोत्पादन, बागायतकाम यासाठी लागणारे साहित्य आणि त्याविषयी माहिती सांगितली.कीटकशास्त्र या विषयासंबंधी वेगवेगळे ट्रॅप दाखून त्याबद्दल माहिती सांगितली.असे कृषी अभ्यासक्रमामद्ये असलेले सगळे विभाग त्यातील साहित्य आणि त्याबद्दल माहिती सांगितली.तसेच वेगवेगळ्या विषयाचे चार्ट त्यात दाखवण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषि कन्या सारिका मुंढे, असावरी नरवटे, सृष्टी पोळके, कांचन रहाडे, वैष्णवी थोटे, आश्लेषा वाकडे यांनी परिश्रम घेतले. तर ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री अनंत कृषी विकास प्रतिष्ठान संस्थेचे सहसचिव डॉ. जि. व्ही. साळुंके सर हे मार्गदर्शन करत आहेत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. मोरे, कार्यक्रम समन्वयक तसेच विस्तार विभाग विषयाचे तज्ञ प्रा.बि.डी. तायडे तसेच वंजारवाडी गावसाठी कार्यरत असलेले कार्यक्रम अधिकारी प्रा. बी.बी तांबोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा