परिवर्तनाचे शिलेदारांच्या वतीने वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न 




परिवर्तनाचे शिलेदारांच्या वतीने वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न
संपूर्ण महाराष्ट्रात वामन दादा कर्डक अध्यासन केंद्र निर्माण व्हावे: डॉ संजय पाईकराव
संभाजीनगर 
वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वाय कॉर्नर येथे व्याख्यान व भीम गीतांचा कार्यक्रम परिवर्तनाचे शिलेदार च्या वतीने प्रकाश उजगरे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून या वेळी महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन  केंद्रचे  मा.संचालक प्राध्याप डॉ. युवराज धबडगे, डॉ. संजय पाईकराव, इतिहासकार,यांनी वामनदादा बद्दल त्यांनी केलेल्या लिखाणाबद्दल त्यांच्या त्यागा बद्दल दादांनी वाहून नेलेल्या आंबेडकरी चळवळीच्या योगदाना बदल,यांनी मार्गदर्शन केले.व सोनू गायकवाड, ,समता टोमके यांनी आपल्या परिवर्तनात्मक गीतांचे सादरीकरण केले व यावेळी सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंचल जगताप, दिपक पंडित, अमन घंनसावध, संघर्ष गायकवाड, संतोष शिरसाट, स्वप्नील नंद यांनी परिश्रम घेतले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा