भक्तीचा जिव्हाळा जाणणारेच श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर येतात- चिन्मय महाराज सातारकर




भक्तीचा जिव्हाळा जाणणारेच श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर येतात- चिन्मय महाराज सातारकर गोरक्षनाथ टेकडीवर शुद्ध परमार्थ पाहायला मिळाला- सातारकर

बीड दि २६ प्रतिनिधी- भक्तीचा जिव्हाळा जाणणारेच श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर येतात. संतांच्या उपकाराची परतफेड करायची नसते,तर त्यांच्या ऋणात राहायचे असते. सद्गुरू किसन बाबा सारख्या संतांची आशीर्वादाची नजर असली की जीवनात काहीच कमी पडत नाही. अस प्रतिपादन श्री ह भ प चिन्मय महाराज सातारकर यांनी केले. गोरक्षनाथ टेकडी येथे सद्गुरु किसन बाबा यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळयात दुसरे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते.यावेळी प्रमूख उपस्थिती शांतीब्रह्म महंत नवनाथ बाबा, श्री ह भ प नाना महाराज कदम, श्री ह भ प हरिदास भाऊ जोगदंड,गणेश महाराज बांडे, वासुदेव म सुरवसे,भरत म पठाडे, अरुण मकदम, तुकाराम म राऊत, संतोष म वाघ, पुरुषोत्तम म कोटुळे, जगन्नाथ म कराळे, सचिन म थापडे,सचिन म मुंडे,ज्ञानेश्वर म खोटे,रामेश्वर म दराडे, ज्ञानदेव काशीद यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती..

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात दुसरे कीर्तन पुष्प श्री ह भ प चिन्मय महाराज सातारकर यांचे संपन्न झाले. संत तुकाराम महाराजांच्या

जाणे भक्तीचा जिव्हाळा! तोची दैवाचां पुतळा !! आणिक नये माझ्या मना! हो का पंडीत शहाणा!!
नाम रुपी जडले चित्त!! त्याचा दास मि अंकित!!
तुका म्हणे नवं विध! भक्ती जाणे तोची शुद्ध!!

या अभंगावर गोड चिंतन मांडले. यावेळी बोलतांना महाराज म्हणाले की गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत कीर्तन करण्याचा योग प्राप्त होणे हे भाग्यच लक्षण आहे. संत हे सामान्यांचा उद्धार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करत असतात. संत तुकाराम महाराज , संत ज्ञानेश्वर महाराज, संत मंडळी ग्रंथांच्या माध्यमातून देव आपलासा करण्याची खूप मोठी किमया साकारली आहे. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो स्वतः देवत्वाला प्राप्त होतो. संत तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगताना माझ्या मनाला दुसरी कुठलीही गोष्ट रुचत नाही. पंडित आणि शहाणा जरी असेल तरी देखील त्याला भक्तीचा जिव्हाळा जाणणं महत्त्वाच आहे.. ज्याचे चित्त नामाच्या ठिकाणी एकनिष्ठ जडलेले आहे.त्याचा दास होण्यास व त्याचां अंकित होऊन राहण्यास मी तयार आहे. शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात नवविध भक्ती जाणणारा तोच शुद्ध असतो. आज गोरक्षनाथ टेकडीवर शुद्ध परमार्थ पाहायला मिळाला. असही चिन्मय महाराज सातारकर यांनी सांगितलं.

झोपेतून उठवनारा, चालायला लावणारा, बोलायला लावणारा खाल्ले पचवनारी शक्ती देव आहे. आज आधुनिक युगात आई-वडिलांचे सेवा करणारे
कमी झाल्यानं वृध्दाश्रम वाढले आहेत ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे आई-वडिलांची सेवा करा असा मोलाचा संदेशही महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिला.

या कीर्तनासाठी साथ संगत महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक व गोरक्षनाथ टेकडी परिसरातील सर्व टाळकरी मंडळी यांची उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा