साडेचार लाखाचे मोबाईल चोरणारा चोरटा जेरबंद
साडेचार लाखाचे मोबाईल चोरणारा चोरटा जेरबंद

 स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी
पो.स्टे.नेकनूर हद्दीतील जेताळवाडी येथील न्यु सरकार सपना बिअरबारमध्ये झालेली घरफोडी स्था.गु.शा.बीड ने उघडकीस आणुन आरोपी केले जेरबंद
नेकनूर
दिनांक 17-8-2023 रोजी 00.01 ते 02.00 वा. सुमारास मौजे जेताळवाडी ता.जि.बीड गावातील न्यु सरकार सपना बिअरबारमधील खोलीमध्ये अज्ञात चोरटयाने खिडकीतुन खोलीमध्ये प्रवेश करून मोबाईल, रोख रक्कम असा 4,50,000/- रु चा मुद्येमाल चोरून नेला होता. सदर घटनेवरून फिर्यादी शिवलिंग पांडुरंग मोराळे व्यवसाय व्यापार रा.निवडुंगवाडी ता.जि.बीड यांनी दिनांक 18/08/2023 रोजी पो.स्टे.नेकनूर येथे दिलेल्या फिर्याद वरून गुरनं 240/2023 कलम 457,380 भादंवि अन्वये अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.यांनी गुन्हयाचे विश्लेषण करून तात्काळ सदर गुन्हयास भेट देवून गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. स्था.गु.शा.पथकाने दिनांक 29/8/2023 रोजी आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीचे आधारे होळ येथे एक विधी संघर्षग्रस्त बालक व 2)इसम नामे समाधान महादेव घुगे रा.होळ यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. त्यावरून पंचासमक्ष घरझडती घेण्यात येवून 2,75,000/- रु चा गुन्हयातील मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा,बीड पथकाने आरोपी समाधान महादेव घुगे रा.होळ व विधी संघर्ष ग्रस्त बालक यांना मुद्येमालसह पो.ठा.नेकनूर यांचेकडे स्वाधीन केले आहे. सदर आरोपीकडून आणखीन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्तता असून पुढील तपास पो.स्टे. नेकनूर व स्था.गु.शा. पथक करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक बीड, मा.श्री.सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा येथील पोनि श्री. पो.नि. संतोष साबळे, पोउपनि सुशांत सुतळे, पोह/रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, अर्जुन यादव, चालक अतुल हराळे यांनी केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा