नगररचनाकार तीस हजार घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात




 

मराठवाडा पत्र |

शिरूर कासार – येथील नगररचनाकार अंकुश लिमगेसह एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० हजारांची लाच घेताना आज (दि. ३०) बीडमध्ये पकडले आहे.

शिरूर नगरपंचायतच्या हद्दीतील ऑनलाईन बांधकाम परवान्यासाठी नगररचनाकार अंकुश लिमगे यांनी तक्रारदारकडे ४० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लिगे व अन्य एका व्यक्तीला पकडले आहे. सध्या याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांनी दिली.

*यशस्वी सापळाअहवाल*
दि.30/8/2023

▶️ युनिट- बीड
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 46वर्ष,
▶️ आरोपी -1) अंकुश जगन्नाथ लिमगे वय 30 वर्ष पद सहायक नगर रचनाकार बिड अतीरीक्त कार्यभार शिरुर नगर पंचायत तसेच प्रभारी नगर रचनाकार बीड वर्ग २
रां . नाईक नगर नांदेड ह.मु. विद्यानगर बिड

2) ईझारोद्दीन शेख मैनोद्दीन वय 28 खाजगी अभियंता रा शिरुर कासार

▶️ लाच मागणी – 40000/- रू. तडजोड अंती 30000/- रू.
➡️ लाच पडताळणी – दि 30/8/2023
➡️ लाच स्विकारली – 30000 रुपये
➡️ लाच स्विकारली – दिनांक 30/8/2023

▶️ कारण – तक्रारदार यांनी शिरुर कासार येथे घराचे बांधकामा करीता अक्रुशक क्षेत्र सुमारे 6737 चौरस फुट सहान जागा खरेदी केली होती त्या जागेची गुंठेवारी देखील करण्यात आली होती . त्यानंतर तक्रारदार यांनी जागेची संयुक्त मालक या नात्याने बांधकाम परवानगी मिळण्यासाठी खाजगी अभियंता श्री शेख ईझारोद्दीन यांचे मार्फत दि.14/7/2023 रोजी बी.पी.एम.एस पोर्टल वर अॅानलाईन अर्ज केला होता . परंतु यातील लोकसेवक अंकुश लिमगे नगर रचनाकार यांनी दि22/7/2023 रोजी त्रुटी काढुण पुनर्र पडताळणी साठी प्रलंबित ठेवला व खाजगी अभियंता यांचे मार्फतीने तक्रारदार यांना 40000 रुपयाची मागणी केली तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि येथे तक्रार दिली .त्या अधारे लाच मागणी पताळणी केली असता लोकसेवक श्री अंकुश लिमगे यांनी 40000रुपयाची मागणी करुन तडजोडअंती 30000 रु खाजगी अभियंता कडे देण्यास सांगितले . त्यानरुन सापळा कारवाईचे आयोजन नगर परिषद बिड कार्यालयासमोर केले असता खाजगी अभियंता ईझारोद्दीन याने तक्रारदार यांचेकडुन 30000 रुपये स्वीकारताच त्यास लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले तसेच लोकसेवक अंकुश लिमगे यांना ताब्यात घेण्यात आले आहे .पोलीस स्टेशन बिड शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे

▶️ सापळा अधिकारी –
शंकर शिंदे पोलीस उप अधिक्षक
मो 9355100100

▶️मार्गदर्शक- मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.
9923023361
मा .श्री. विशाल खांबे, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.औरंगाबाद.
मो.नं.8788644994

➡️सापळा पथक – सुरेश सांगळे , हनुमान गोरे संतोष राठोड ,
▶️सहायक सापळा अधिकारी व पथक
श्री गुलाब बाचेवाड पो.नी.
अमोल खरसाडे, श्रीराम गिराब , भरत गारदे अविनाश गवळी, ला .प्र. वि.बीड
#बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.
*भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास*
*टोल फ्री क्र:- 1064
*मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद:-*9923023361* संपर्क साधावा. ला. प्र. वि.बीड दूरध्वनी क्रमांक (02442-222649)

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा