गेवराई नगरपरीषदेसमोर सामुहिक अत्मदहनाचा सुंदर काळेचा ईशारा
 

वेळोवेळी निवेदन दिले तरी गेवराई नगरपरीषद रस्ते-नाले तयार करत नाही.

गेवराई 

मराठवाडा पत्र

रस्ते – नाले करत नसताल तर रोग होऊन मरण्यापेक्षा नगरपरीषद समोर अत्मदहन करुन मरतोत अशी भावना गेवराई शहरातील सुंदर बप्पा काळे यांनी व्यक्त केली.
वेळोवेळी निवेदन देऊन कळवले तरी गेवराई नगरपरीषद, गेवराई शहरांतर्गातील माऊली नगर, बाळराजे / ढोराज नगर, वाघमारे गल्ली या भागात रस्ते-नाले तयार करत नाही.
वेळोवेळी निवेदन देऊन अंदोलने करुनही रस्ते व नाल्यांचा गेवराई शहरातील प्रश्न मार्गी लागत नसतांना गेवराई नगरपरीषदेला पुरस्कार कसे मिळाले असतील अशी चर्चा नागरीक करत आहेत.
यामुळे रहदारी करतांना अनेक संकटांना या भागातील नागरीकांना सामोरे जावे लागते. नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन ठीक-ठिकाणी डबके साचतात, रस्त्यावर चिखल होतो याचा नाहक त्रास पादचाऱ्यांसह वाहनधारकांना होत आहे. त्याचबरोबर रस्ते व नाले नसल्याने या भागातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
वेळोवेळी लेखी निवेदन, अर्ज दिले, संबंधीत अधिकारी यांची भेट घेवून सांगतले तरी रस्ते व नाले करत नसल्याने गेवराई नगरपरीषदेचे मुख्याधिकारी यांना स्मरणपत्र देऊन तात्काळ माऊली नगर, बाळराजे /ढोराज नगर, वाघमारे गल्ली या भागातील रस्ते व नाल्याचे काम न केल्यास दि. १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी सुंदर बप्पा काळे, संभा रत्नपारखे, बाबासाहेब वाघमारे, किशोर वाघमारे, शिवाजी केदार सामुहिक अत्मदहन करणार असल्याचा ईशारा दिला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा