मौजे ईट येथील चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ
मौजे ईट येथील चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ!

अंगणवाडी बालकांना निकृष्ट डाळीचा पुरवठा, सखोल चौकशी व्हावी

डाळ व तांदूळ या मध्ये पांढऱ्या आल्याडाळ व तांदळा मध्ये अळ्या

बीड जिल्ह्याच्या अंगणवाडीतील बालकांना पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाच्या डाळी वाटप करण्यात आल्या आहेत का ? अंगणवाडी सेविकानी निकृष्ट तांदूळ , डाळ शिजली.

बीड, जिल्ह्यातील अंगणवाडीत 0 ते 3 वयोगटातील बालकांसाठी पूरक पोषण आहार पुरवठा केला जातो. हा आहार पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण सहकारी संस्था यांनी तीन ठेकेदारांना नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत राज्यभरात या पोषण आहाराचा पुरवठा होतो. पूरक पोषण आहारअंतर्गत मसूर डाळ, मूग डाळ, तेल, मीठ, मिरची, हळद, चना, गहू आणि तांदूळ आदी साहित्य वाटप केले जाते.

मागील महिन्यात पुरवठादाराने अंगणवाड्याना दिलेली मसूर डाळ, मूग डाळ अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील महिलांनी केल्या होत्या, या तक्रारींच्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी बीड तालुक्यातील ईट येथील अंगणवाडी मध्ये जाऊन पोषण आहाराच्या धान्याची तपासणी केली. यावेळी मसूर डाळ व मूग डाळीचे पाकिटे फोडून तपासली असता, मूग डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. शिवाय या पाकिटावर पुरवठादाराचे नाव, एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, बॅच नंबर आधी कोणतीही माहिती नमूद नसल्याचे दिसून आले.

सखोल चौकशी व्हावी

जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण शून्य करण्यासाठी पोषण आहार योजना राबवली जाते. बालकांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळाला पाहिजे. अशा निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे. या घटनेची प्रशासनाने सखोल चौकशी करावी. संबंधित पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी ई ट येथील गावकऱ्यांनी केली आहे.

निकृष्ट धान्य वाटप थांबवा !

पूरक पोषण आहारअंतर्गत मुगडाळ निकृष्ट असल्याच्या तक्रार अंगणवाडी सेविकेने केली मात्र तिला डाळ व तांदूळ तोच शिजव असे देखील ईट येथील वरिष्ठ अंगणवाडी कर्मचात्यांनी सांगितले आहे. याची संपूर्ण चोकशी होणे गरजेचे आहे.
चिमुकल्यांच्या जीवनाशी खेळणे हे कितपत योग्य आहे.

. निकृष्ट धान्य वाटप थांबवा, या घटनेची सखोल चौकशी करा.
-महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा