चिंचवणमध्ये सोमवारी कुलस्वामिनी जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वांनी उपस्थित राहण्याचे संयोजकांचे आवाहन
चिंचवणमध्ये सोमवारी कुलस्वामिनी जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
सर्वांनी उपस्थित राहण्याचे संयोजकांचे आवाहन

 

वडवणी प्रतिनिधि

वडवणी तालुक्यातील मौजे चिंचवण या ठिकाणी येत्या सोमवार दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी कुलस्वामिनी जगदंबा (तुळजाभवानी) देवीची नविन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याच अनुषंगाने अगोदरच्या दिवशी म्हणजेच रविवारी कुलस्वामिनी देवीच्या नविन मूर्तीची भव्य शोभायात्रा ग्राम प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली असून याप्रसंगी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समस्त गावकरी मंडळी व तरुण मित्र मंडळ चिंचवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील डोंगरपट्याचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचवण नगरीमध्ये कुलस्वामिनी जगदंबा (तुळजाभवानी) देवीची नविन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असून या अनुषंगाने रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ८ वाजता कुलस्वामिनी देवीच्या नविन मूर्तीची भव्य शोभायात्रा ग्राम प्रदक्षिणा मंदिरापासून देवीला रथामध्ये आरुढ करुन सवाद्य बँड पथक, लेझीम पथक, संबळ वाद्य पथक, आराधी मंडळ व गोंधळी पथक यांच्यासह गावातून प्रदक्षिणा होईल. देवीस जलादिवास, धान्यादिवास, पुष्पादिवास, न्यास व शय्यादिवास आणि हवन होईल. तसेच रात्री आराधी मंडळाचा जागर होईल. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी देवीला विविध महास्नाने, हवन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि प्रसादस्नपन्न होईल. हवन पूर्णाहुती व आरती होईल. त्यानंतर लागलीच भव्य महाप्रसादाच्या पंगतीस सुरुवात होईल. यावेळी अरुण रामकिसन बडे, आश्रूबा सैदू तांबडे मुकादम, शेख समशेर अब्दुल मुकादम, शिवाजी आश्रुबा तुरे, वसुदेव गोवर्धन तांबडे या सर्वांतर्फे महाप्रसाद होईल. चिंचवण येथील संत भगवानबाबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत या वेळेत ही महाप्रसादाची पंगत संपन्न होईल. तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ गावातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त, भजनी मंडळ, आराधी मंडळ, व समस्त गावकरी मंडळ व तरुण मंडळ यांनी घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी व तरुण मित्र मंडळ चिंचवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा