पाटबंधारे कर्मचारी सह पतसंस्था पाटोदा स्विकृत संचालक पदी विजयकुमार शिनगारे निवड
पाटबंधारे कर्मचारी सह पतसंस्था पाटोदा स्विकृत संचालक पदी विजयकुमार शिनगारे निवड

२९ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न
➖•••➖

पाटोदा दि १६ सप्टेंबर २०२३ शनिवारी पाटबंधारे पतसंस्थेची २९ वी वार्षिक सभा संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री बन्सीधर गोल्हार यांचे अध्यक्षतेखाली व विद्यमान चेअरमन विश्वास खतीब यांचे मार्गदर्शनाने संस्थेचे स्विकृत संचालक म्हणून श्री विजयकुमार शिनगारे जायकवाडी बीड यांची निवड जाहीर करण्यात आली.*
*पतसंस्थेची वार्षीक सभा विद्युत भवन पाटोदा येथे संपन्न झाली सभेत उपविधीतील घटना, राखीवनिधी कमी करण्याचे दुरुस्तीस व तातडी कर्ज मर्यादा पन्नास हजार रु वाढ करणे व ७/५० टक्के लाभांश वाटपास सर्वानुमते मान्यता दिली सभेनंतर लाभांश वाटप करण्यात आला या वार्षिक सभेसाठी अवर्जुन उपस्थित माजी सचिव विष्णू ससाणे, माजी संचालक शेख महेबुब, दुधवणे मामा, सेवा निवृत्त सभासदाचा व नवीन सभासदाचा यथोचित सत्कार करण्यात आला, या सभेला संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी धनराज लाड, मिसाळ, साबळे साहेब, गणेश शहाणे, गंगाधर, वाळके, वाजेदभाई, टाक, श्रीमती उषा जावळे, सुनिता खाडे व गेवराई, बीड, धारुर, शिरुर, आष्टी, उमापुर येथील बहुतांश सभासदाच व संस्थेचे कर्मचारी सुभाष जाधव, इमरान, मंडलीक सभेला उपस्थित होते सभेनंतर सर्वानी अल्पोपहार घेऊन सभा उत्साहात संपन्न झाली सभेला उपस्थितांचे व विद्युत भवन संस्थेच्या वार्षिक सभेला उपल्ब्ध केल्याबद्दल विद्युत पतसंस्थेचे आणि लेखा परीक्षक श्री तांबे यांनी संस्थेला “अ” वर्ग दिल्याबद्दल सर्वाचे आभार संस्थेचे सचिव धनराज लाड यांनी व्यक्त केले*

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा