बलिदान,त्याग, संघर्ष हृदयात राहील.प्रा.अंजली पाटील




बलिदान,त्याग, संघर्ष हृदयात राहील.प्रा.अंजली पाटील

अंबाजोगाई

क्रांतीज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित नवजीवन मेंटल हेल्थ केअर अँड डी-एडिक्शन सेंटर वाघाळा व संस्कार मेंटल हेल्थ केअर अँड डी एडिक्शन सेंटर सेंटर अंबाजोगाई येथे 75 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त.प्रकल्प संचालिका प्रा. अंजली पाटील व प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजकुमार गवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी व सर्व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात प्रा.अंजली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजकुमार गवळे सर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप प्रा.अंजली पाटील यांनी केला. प्रकल्प समन्वयक संतोष राजपंखे, सुषमा सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा सरवदे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ लेखापाल भगवान आव्हाड यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सेंटर इन्चार्ज ओम डोलारे,अमोल लोमटे,भडके मामा, गणेश गुजर शेख मुनीर सहदेव तरकसे अशोक सोनेके,शंभो, रेणुका लोहार साखरे माऊशी आदि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा