एपिआय नवलेंची राक्षसभुवन शिवारात तिन हायवा एक टीप्परवर कार्यवाही




एपिआय नवलेंची राक्षसभुवन शिवारात तिन हायवा एक टीप्परवर कार्यवाही
हायवा सह चालक दिले चकलांबा पोलिसांच्या ताब्यात.

गेवराई / प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शिवारातुन तिन भारत बेंझ कंपनीचे हायवा व एक अशोक लिलेंड कंपनीचे टीप्पर हे विना परवाना अवैध वाळु वाहतुक करतांना चालकांसह एपिआय भास्कर नवले यांनी पकडून चकलांबा पोलिस ठाण्यात दाखल केले.
सविस्तर वृत्त असे की बीड, गेवराई, चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगारी रोखण्यासाठी पेट्रोलिंग करत असतांना बुधवार दि.२७ पहाटे ५.५० दरम्यान राक्षसभुवन ता. गेवराई जवळ वाळु वाहतुक करनारे तिन हायवा व एक टीप्पर आढळून आले, एपिआय भास्कर नवले यांनी त्यांना थांबवुन विचारपूस केली असता भारत बेंझ कंपनीचे हायवा क्र. एमएच २१ बीएच ५९२२,एमएच २३ एयु २६२४, एमएच १७ बीवाय ५८९८ यांच्यात प्रत्येकी अंदाजे ६ ब्रास आणि एक अशोक लिलेंड कंपनीचा टीप्पर क्र. एमएच २१ बीएच ५९३९ याच्यात अंदाजे ३ ब्रास वाळू आढळून आली ही वाळु राक्षसभुवन येथुन भरून आणल्याची माहिती विचारपूस केली असता मिळाली, वाळु वाहतुक करनाऱ्या चालकांकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आल्यावरुन, आनंद शामराव शिंगटे वय २५ वर्षे रा. झापेवाडी ता. शिरुर का. जि. बीड, दाराशिंग गोरख चव्हाण वय ३४ वर्षे रा. तुपेवाडी तांड ता. जि. संभाजीनगर, आशोक रावसाहेब डिंगरे वय ४५ वर्षे रा. खामगाव ता. गेवराई जि बीड आणि वैजीनाथ नारायण भांडवलकर वय ३७ वर्षे रा. अंकुशनगर (महाकाळा) ता. आंबड जि. जालना यांना हायवा व टिप्परसह चकलांबा पोलिस ठाण्यात जमा केले असून, पुढील कार्यवाहीसाठी विना परवाना वाळु वाहतुक करत असल्याप्रकरणी तहसिलदार, तहसिल कार्यालय गेवराई व ओव्हरलोड वाळु वजन प्रकरणी मा. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांच्याकडून तपासणी करुन सदरचा आहवाल मा. पोलिस अधिक्षक बीड व मा. अप्पर पोलिस अधिक्षक बीड यांच्याकडे सादर करण्याची सुचना चकलांबा पोलिसांना दिली असल्याची माहिती एपिआय भास्कर नवले यांनी दिली. सदरील कार्यवाही करण्यासाठी महेश रोईकर, विनोद सुरवसे, मदन जगदाले यांनी सहकार्य केले. अवैध वाळु वाहतुक करनारांचे एपिआय नवले यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे चांगलेच ढाबे दणाणून गेले असल्याची चर्चा गेवराई तालुक्यात सुरू आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा