केसापूरी येथे एक तारीख एक तास परिश्रम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व परिसर स्वच्छता
केसापूरी येथे एक तारीख एक तास परिश्रम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व परिसर स्वच्छता
माजलगाव
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसापूरी येथे दि ०१ ऑक्टोंबर रविवार रोजी एक तारीख एक तास परिश्रम या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले व शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांनी उत्साह पूर्वक आपला सहभाग नोंदवला.
तालुक्यातील केसापुरी गावातील शिक्षण प्रेमी नागरिक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य श्री हारुण भैया देशमुख यांनी शाळेला बारा हजार रुपये किमतीचे झाडे भेट दिली.तसेच झाडे लावण्यासाठी जेसीबी सहकार्य माजी सरपंच विलास साळवे यांनी केले.या उपक्रमामध्ये गावातील जेष्ठ नागरिक उत्तमराव शिंगाडे,भारत आबा साबळे,अतुल सोळंके (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती केसापुरी),सादोळा केंद्राचे केंद्रप्रमुख शिनगारे,मुंजाबा साबळे,दिलीप साळवे,रामेश्वर शिंगाडे,सचिन लाहाडे,अरुण राऊत,मदन चव्हाण,विलास चव्हाण,सुरेश माळवदे,केशव घाटूळ,उमेश धोंडे, बाबासाहेब साळवे,मल्हारी साळवे,भीमाशंकर कोरडे,ज्ञानेश्वर साबळे,शाळेचे मुख्याध्यापक किरण साळवे, शिक्षक दादासाहेब नाईकवाडे,श्रीमती शामल पाटील, श्रीमती बागडे संगीता सर्व विद्यार्थी या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला.
सर्व ग्रामस्थांचे शाळेचे मुख्याध्यापक किरण साळवे  यांनी आभार मानले.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा