आराध्या  जाधवचे अबॅकस  परीक्षामध्ये सर्वोत्कृष्ट यश !




आराध्या  जाधवचे अबॅकस  परीक्षामध्ये सर्वोत्कृष्ट यश !

बीड

बौद्धिक आणि सर्वांगीण विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. शहरांमधील अबॅकस व वैदिक स्टडी केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस आणि वैदिक चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन अबॅकस प्रथम लेवलपरीक्षांमध्ये ज्युनियर ग्रुपमध्ये आराध्या किशन जाधवला जागतिक अबॅकस चॅम्पियनशिप मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आहे. बीडच्या अबॅकस सेंटर मध्ये 12 ऑक्टोबर 2023 रोजी निकाल जाहीर झाल्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट प्रथम मेडलिस्ट मिळवून आराध्या किशन जाधवचे सर्वोत्‍कृष्‍ट गोल्ड मेडलिस्ट रँकर चॅम्पियनशिपमध्ये सहभाग मिळवला आहे. जागतिक अबॅकस स्पर्धा डिसेंबर 2023 मध्ये होत असून त्यामध्ये भारतासह पनामा, मोरोक्को, नेपाळ, श्रीलंका, युनायटेड किंग्डम, यु एस ए , सिंगापूर, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका, देशांमधील पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यी सहभाग घेणार आहेत. आराध्या किशन जाधवचे यशामध्ये अबॅकस शिक्षक डॉ. ए एस घोडके यांचे मोलाचे सहकार्य लागली आहे. आराध्या किशन जाधवचे गणित बद्दल असणारी भीती दूर होऊन अनेक गणिते सहज आणि सोप्या पद्धतीने वेळेच्या आत मध्ये सोडवले जात आहेत असे तिने सांगितले आहे. ओसाका अबॅकस असोसिएशन चेअरमन, आय सीएम एस मॅनेजिंग डायरेक्टर श्री प्रसाद अग्रवाल तामिळनाडू तसेच अरिस्तो किड्स मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा ओरिसा आणि , जी एस ए अबॅकस असोसिएशनचे श्रीनिवासन कुमारण दिल्ली, अबॅकस स्टडी सेंटरचे आयोजक डॉ. ए एस घोडके यांनी आराध्या किशन जाधवचे मिळवलेल्या यशाचे अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. समाजातील सर्व स्तरांमधून आराध्या किशन जाधवचे अभिनंदन होत असून उज्वल भविष्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व त्याचे मित्र, नातेवाईक यांनी कू.आराध्या किशन जाधवला दैनिक मराठवाडा पत्रच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा