चिंचवण येथे श्री. जगदंबा यात्रा महोत्सवाचे आयोजन




 

चिंचवण येथे श्री. जगदंबा यात्रा महोत्सवाचे आयोजन

चींचवण

दर वर्षी प्रमाणे याही वर्षी मौजे चिंचवण ता. वडवणी जि. बीड याठिकाणी श्री. जगदंबा (तुळजाभवानी) यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्या शुक्रवार रोजी रात्री ८ वाजता श्री. जगदंबा देवीचा पालखी मिरवणूक निघेल तर शनिवार रोजी दुपारी जंगी कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत. तरी पंचक्रोशीतील पैलवानांनी, भाविकांनी व नागरिकांनी यात्रेतील कार्यक्रमांचा व कुस्त्यांच्या सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी व यात्रा समिती चिंचवण यांच्या वतीने करण्यात आले आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवण या ठिकाणी प्रत्येक वर्षी श्री. जगदंबा (तुळजाभवानी) देवीचा यात्रा महोत्सव मोठ्या हर्षोल्हासात संपन्न होतो. याच अनुषंगाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या दोन दिवसीय श्री. जगदंबा (तुळजाभवानी) यात्रा महोत्सवाचे आयोजन चिंचवण या ठिकाणी करण्यात आले असून यामध्ये उद्या शुक्रवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ठीक ८ वाजता श्री. जगदंबा देवीचा पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात येईल. तसेच शनिवार दिनांक २८ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये जंगी कुस्त्यांच्या सामन्यांचा कार्यक्रम संपन्न होईल. या जंगी कुस्त्यांसाठी सुरुवातीचे बक्षीस १० रुपये ते शेवटचे बक्षीस ५ हजार १ रुपये असे राहील. तरी या कुस्त्यांच्या सामन्यांसाठी परिसरातील सर्व पैलवानांनी उपस्थित राहून जंगी कुस्त्यांच्या सामन्यात सहभागी व्हावे. तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक गण व नागरिकांनी या दोन दिवसीय यात्रेतील कार्यक्रमांचा व जंगी कुस्त्यांच्या सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहनही समस्त गावकरी मंडळी व यात्रा समिती चिंचवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा