आदित्यमध्ये रंगणार मराठवाडास्तरीय  हॉलीबॉल स्पर्धा




मराठवाड्यातील कृषी महाविद्यालयाचे विविध संघ बीडमध्ये दाखल

बीड ।
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आंतर महाविद्यालयीन  हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन बीड शहरातील नामांकीत आदित्य कृषी महाविद्यालयात आज दि.9 नोव्हेंबर रोजी होत आहेत. या स्पर्धेची संपूर्ण तयारी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत संघ सहभागी होणार  असून काही संघ दाखल झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश कचरे यांनी दिली.
या आंतर महाविद्यालय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्या तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदितीताई सारडा यांच्या हस्ते होणार आहे.
आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना क्रिडा क्षेत्रातही मोठी संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आंतर महाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन बीड शहरातील नामांकीत आदित्य कृषी महाविद्यालयात आज दि.9 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस.एस. मोरे सर, तर प्रमुख उपस्थिती म्हणून बीड जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख राहणार आहेत. सदरील स्पर्धेसाठी मराठवाड्यातील विविध कृषी व संलग्न महाविद्यालयाचे संघ सहभागी होणार आहेत. सदरील स्पर्धा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षक अधिकारी  डी.एफ. राठोड सर, शाहू चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. मराठवाड्यातून येणार्‍या सर्व संघाचे आदित्य शिक्षण संस्थेमध्ये सर्व सोयी सुविधेने स्वागत करण्यात येत आहे, सदरील स्पर्धेसाठी आदित्य कृषी, कृषी अभियांत्रिकी , अन्नतंत्र, व जैवतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या उत्साहात  सदरील कार्यक्रम ची तयारी करत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा