संस्कार विद्यालया मध्ये क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी




संस्कार विद्यालया मध्ये क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

बीड: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्कार विद्यालयामध्ये अनेक क्रांतिकारी महिलांची वेश-भूषा विद्यार्थीनिनी धारण केली होती. संस्कार विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो . समस्त स्त्री वर्गासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे ज्या ठिकाणी या ज्योतीचा जन्म झाला त्याच ठिकाणी आम्ही या शिक्षण क्षेत्रात येऊन कर्तव्य बजावत आहोत याहून सुवर्णक्षण तो काय .
नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे या ज्योतीचा जन्म झाला आणि ही अखंड ज्योत समस्त स्रीवर्गाच्या आयुष्यात ज्ञान ज्योत बनून आली . आमच्या आयुष्यातला अंधकार नष्ट झाला . याच आदरणीय सावित्री माई फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या शाळेतही बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. वंदनीय क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाईंना विनम्र अभिवादन🙏🏻🌹📚✒️

त्यांच्या समवेत संस्कार विद्यालयातील गुरुजन वर्ग, खवलेताई , मुख्याध्यापिका- जाधवताई, जोशी सर, टेकाळे,शिंदेताई ,रसाळताई , तन्श्री नरनाळे हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची वेशभुषा केली , त्यावर संभाषण केले. या वेळी दैनिक मराठवाडापत्र चे संपादक दत्तात्रय नरनाळे छायाचित्रात दिसत आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा