संस्कार विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन उस्तहात साजरा




संस्कार विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन उस्तहात साजरा.

बीड येथील संस्कार विद्यालयातील इयत्ता पहिली दुसरी विभागात पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला.सर्वप्रथम मा. मुख्याध्यापिका श्रीमती जाधव ताई, विभाग प्रमुख श्रीमती रसाळ ताई व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती पारगावकर ताई यांच्या हस्ते सावित्री बाई फुले व देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींनी डॉक्टर, इंजिनिअर,वकील,शिक्षक सैनिक, सावित्रीबाई फुले,जिजाऊ,झाशीची राणी अशा विविध वेशभूषा केल्या होत्या आणि त्याच बरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती देखील सांगितली. श्री.टेकाळे सर यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व त्या पहिल्या महिला शिक्षिका कशा झाल्या हे सांगत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी,सहकारी शिक्षक विभाग प्रमुख, मा.मुख्याध्यापिका श्रीमती जाधव ताई उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा