वडवणी निष्ठावंत शिवसैनिक विनायक बप्पा मुळे यांची तालुकाप्रमुख पदी वर्णी’
वडवणी निष्ठावंत शिवसैनिक विनायक बप्पा मुळे यांची तालुकाप्रमुख पदी वर्णी’

वाघ पुन्हा मैदानात

वडवणी

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुख पदी विनायकबप्पा मुळे यांना पुन्हा मिळाली संधी मिळालेली आहे. काल दै.सामना वर्तमानपत्रामधून‌ बीड जिल्हातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये विनायक मुळे यांची तालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेले आहे. वडवणी शहरांमध्ये व जिल्ह्यामध्ये विनायक बाप्पा मुळे यांचे सत्कार समारंभ मोठ्या प्रमाणात त्यांचे स्नेही कार्यकर्ते करत आहेत व सोशल मीडियावर ही निष्ठावंत शिवसेनेची नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे, शुभेच्छा देत आहेत. वडवणी तालुक्यामध्ये परत एकदा निष्ठावंत शिवसेनेचे पुन्हा संधी मिळाल्यामुळे शिवसेनेमध्ये मोठा आनंद उत्सव साजरा केला जात आहे.
त्यांच्या या निवडीने निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय मिळाल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत. विनायक मुळे यांच्याकडे यापूर्वी वडवणी तालुका प्रमुख पदाची जबाबदारी होती. मध्यंतरी बीड जिल्ह्यात शिवसेनेमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यानंतर विनायक मुळे यांना पदावरून दूर करण्यात आलेले होते. कुठलेही पद नसतानाही विनायक मुळे हे सर्वसामान्य नागरिक व्यापारी यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत होते.
मागील कालखंडामध्ये शिवसेनेमध्ये अनेक घडामोडी घडल्यानंतरही विनायक मुळे हे मातोश्रीवर असलेली आपली एकनिष्ठा कायम ठेवली. त्यांना अनेक ऑफर येत गेल्या त्यांनी फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.
विनायक मुळे मोठा संघर्ष करून सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ जपत त्यांच्या प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून सतत आवाज उठवत राहिले.
विनायक मुळे यांच्यासह वडवणी येथील युवराज शिंदे यांच्याकडे जिल्हा सहसचिव पद देण्यात आले आहे. शहर प्रमुख शिवाजी दुटाळ, वडवणी तालुका समन्वय सचिन धपाटे, शहर समन्वयक अशोक चाटे, उप तालुकाप्रमुख अशोक गोंडे,आकाश सावंत, श्रीराम झाटे,तालुका संघटक महादेव सातपुते यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा