गेवराई तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ पाणी टँकर चालू करा – कालिदास नवले




सरपंच कालिदास नवले यांच्या नेतृत्वाखाली 27 गावच्या नागरिकांचे पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू

गेवराई !
तालुक्यातील पाणी टंचाई बाबत प्रस्ताव देऊन दोन-दोन महिने लोटले तरीही अद्याप या गावांना टँकर चालू न केल्याने वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासन कुठलीच दखल न घेतल्याने 27 गावच्या लोकांना सोबत घेऊन रुईचे सरपंच कालिदास नवले यांनी गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई पंचायत समिती कार्यालयात आतापर्यंत 27 गावच्या सरपंच यांनी टँकर चालू करा या मागणीसाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र 2 महिने लोटले तरीही कुठलीच दखल होत नसल्याने याबाबत रूईचे सरपंच कालिदास नवले यांनी अनेकवेळा पाठपुरावा करत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे व गटविकास अधिकारी कांबळे मॅडम यांची भेट घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने त्यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी लेखी निवेदन देऊन आठ दिवसाच्या आत हे सर्व प्रस्तावित असलेले टँकर चालू करा नसता गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा दिला होता. मात्र यानंतर ही प्रशासनाकडून कुठलीच दखल न झाल्याने सरपंच कालिदास नवले यांनी आज संबंधित गावचे सरपंच यांच्यासह पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला त.बोरगाव नंदू गाडे, धनेश्वर खेत्रे सरपंच भेंड, शेख फत्तु सरपंच नंदपूर, भैय्यासाहेब नाईकवाडे खेर्डा बु, उमेश खेत्रे माजी सरपंच वाहेगाव, विष्णू राठोड जयराम तांडा, विलास शिंदे, रवी जंगले भेंड बु, अविनाश राऊत धानोरा, श्रीराम उबाळे भेंड टाकळी, सचिन खरवडे, सुभाष नवले, रमेश जाधव, शिवप्रसाद नवले, आसाराम लोखंडे, सर्जेराव आरदड, रामनाथ जगदाळे, कृष्णा पवार, शेख जब्बार, वसंत पवार, शरद लाड, दिलीप व्हरकटे, गोराखभाऊ घोंगडे, बाबा जगदाळे, मधुकर नवले, कांताभाऊ नवले, प्रभाकर नवले यांच्यासह अनेक ग्रामपंचायत च्या सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभागी नोंदवत पाठिंबा दिला. दरम्यान याबाबत तात्काळ निर्णय न घेतल्यास संबंधित गावातील सर्व महिला व नागरिक यांना सोबत घेऊन हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे सरपंच कालिदास नवले यांनी सांगितले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा