नेकनूरच्या दीपअंकुर ऍग्रो प्रोडूसरची चौकशी करा – घोडके               




नेकनूरच्या दीपअंकुर ऍग्रो प्रोडूसरची चौकशी करा -रामनाथ घोडके

   नेकनूर
 नेकनूर येथील दीपअंकुर ऍग्रो प्रोडूसर  कंपनीला दिलेल्या अवजार बँक व जिरेनियम उद्योग यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर  कारवाई करण्याची मागणी रामनाथ घोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.                          जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रामनाथ घोडके यांनी नेकनूर येथे असलेल्या दीप अंकुर ऍग्रो प्रोडूसर कंपनी केवळ शासनाच्या 60% सबसिडीसाठी उभी राहिली यामुळे शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. यामध्ये अवजार बँक व जिरेनियम उद्योग याचा समावेश असून  त्यासाठी लागणारी मशिनरी व अवजारे बोगस पद्धतीने कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बोगस टेंडर दाखवून 60 टक्के सबसिडी हडप केली या सर्व बाबीची सखोल चौकशी करून दोशी कडून शासनाने रक्कम वसूल करून कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा