वडवणीतुन मनोज जरांगे पाटील यांनी दिला भाजपचे लोकसभेतील व विधानसभेतील उमेदवार पाडण्याचा इशारा




 

वडवणीत आढावा बैठकीचे रुपांतर झाले विराट सभेत

वडवणी संभाजी लांडे

भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला 10% आरक्षण मान्य करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला असुन तसेच माझ्या अनेक कटकारस्थान करण्यात आले आहेत तसेच माझ्या वर हल्ला करण्याचा हि कट कारस्थान करण्यात आले असून तसेच आता नवीनच माझे व्हिडिओ बनवून मला बदनाम करून मला जीवनातून उठविण्याचा कट रचला जात आहे तरी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार यांना मतदान करू नये व उमेदवार पाडावेत असा इशारा काल दि.14 मार्च गुरुवार रोजी सायंकाळी त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे झालेल्या मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी वडवणी येथील विराट भर सभेतून दिला आहे.
वडवणी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची काल दि.14 मार्च गुरुवार रोजी सायंकाळी 4.00 वाजता त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वडवणी शहरात जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या वतीने भव्य दिव्य रॅली काढून, फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले जरांगे पाटील यांच्या अगमना निमित्त शहर भगवेमय झाले होते यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली तसेच मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण मिळवून दिल्या शिवाय गप्प बसणार नाही तसेच मराठा समाजा सोबत जिव गेला तरी चालेल पण बेईमानी करणार नाही तसेच भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केले फडणवीस हेच मराठा समाजाचे खरे दुश्मन असुन मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे विरोधक हि तेच आहेत तसेच त्यांचे माझ्या विरोधात पहिल्या दिवशीच्या आंदोलना पासून कटकारस्थान सुरू असुन माझेच काही लोक पैसे देऊन फोडून मला बदनाम करण्याचे काम केले तसेच मला सलाईन.व्दारे विष देऊन मारण्याचा डाव रचला होता तसेच मला त्यांनी दिलेले 10% आरक्षण मान्य करण्यासाठी माझ्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणून धमक्या दिल्या जातात तसेच माझ्या वर व माझ्या घरावर हल्ला करून मला जीवनातून उठविण्याचा कट रचला जात आहे तसेच अँड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गौप्यस्फोट केला आहे कि मला कसलेही व्हिडिओ बनवून बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपच्या कार्यकर्त्यां कडून करण्यात येणार आहेत तरी मी जिवंत आहे तोपर्यंत फडणवीस यांना कधीही शरण जाणार नाही तरी ते मला जीवनातून उठविण्याचा डाव टाकत असतील तर मी त्यांना मराठा समाजाच्या जिवावर राजकीय जिवनातुन उठविल्या शिवाय राहणार आहे तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीत भाजपचे 48 व विधानसभेच्या उमेदवार यांना समाजाने मतदान करू नये तसेच उमेदवार पाडावेत असा इशारा दिला.
तरी वडवणी येथील आढावा बैठकीचे रुपांतर विराट सभेत झाले तरी यावेळी वडवणी तालुक्यातील सकल मराठा समाजाचे पुरूष, महिला, लहान मुले यासह बहुजन समाजाचे 20 ते 25 हजार समाज बांधव उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा