चंकलंबा ते पाढरवाडी गेवराई रस्ता कामांची आ.लक्ष्मण पवार यांच्या कडुन पहाणी




चंकलंबा ते पाढरवाडी गेवराई रस्ता कामांची आ.लक्ष्मण पवार यांच्या कडुन पहाणी

गेवराई: मतदारसंघातील चंकलंबा, पौळाचीवाडी, खळेगाव, माटेगाव, देवपिप्री,राजपिप्री,गौडगाव, पाढरवाडी, या रस्त्यांसाठी ग्रामस्थांकडून आ.लक्ष्मण पवार यांच्याकडे सात्त्याने मागणी केली जात होती ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आ.लक्ष्मण पवार यांनी सदरील रस्त्यासाठी निधी मंजुर करून घेऊन आज प्रत्येक्षात रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
चंकलंबा ते गेवराई रस्त्यावर चालु असलेल्या रस्त्याची आज दि 15 रोजी आ.लक्ष्मण पवार यांच्याकडून पहाणी करण्यात आली रस्त्याचे काम दर्जेदारच झाले पाहिजेत यासाठी संबंधित एजन्सीला सुचना केली आहे
विधानसभा मतदारसंघातील आ.लक्ष्मण पवार यांनी स.न.2014 पासून गेवराई मतदारसंघाची जबाबदारी खांद्यावर घेतली तेव्हापासून मतदारसंघाची अत्यंत दैयनीय आवस्था लक्षात घेऊन आ.लक्ष्मण पवार यांनी पाठपुरावा करून मतदारसंघातील रस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हाजारो कोटी रूपये निधी उपलब्ध करून विधानसभा मतदारसंघातील माजलगाव,बीड,गेवराई तालुक्यातील प्रत्येक गाव मुख्य रस्त्याला जोडुन
मतदारसंघातील दळवळणांचा मार्ग सुकर केला आहे
आ.लक्ष्मण पवार फक्त निधी उपलब्ध करून शांत बसत नाहीत सरकारकडून आलेल्या निधी योग्यरितीनी खर्च करून घेण्यासाठी रात्र दिवस प्रमाणिक प्रयत्न करीत आहेत तर प्रत्येक काम दर्जेदारच झाले पाहिजे यासाठी आ.लक्ष्मण पवार सातत्यांने तत्पर असतात म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघातील जनता आ.लक्ष्मण पवार यांच्या कार्याचे कौतुक करत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा