मास विक्री बंद करन्याचे निवेदन पि.आय. केतन राठोड यांना 
मास विक्री बंद करन्याचे निवेदन पि.आय. केतन राठोड यांना
माजलगाव प्रतिनीधी:- शहरामध्ये व तालुक्यातील सर्व हिंदू बांधव याच्या तर्फे विनंती करण्यात येते की १७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमी असून हा दिवस आम्हा सर्व हिंदूंसाठी खूप पवित्र मानला जातो आणि त्या दिवशी सबंध भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणातआनंद उत्सव साजरा केला जातो. तसेच आपल्या माजलगाव शहर आणि सबंध माजलगाव तालुक्यामध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.व  ठीक ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात येतात तसेच सर्व हिंदू बांधव मोठ्या आनंदाने प्रभू श्रीरामचंद्राची मिरवणूक देखील काढतात. त्यामुळे या पवित्र दिनी आम्ही देखील माजलगाव शहरातून प्रभू श्री रामचंद्राची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढणार आहोत त्यामुळे शासन आदेशाप्रमाणे या दिवशी मांस विक्री करण्यास बंदी आहे त्यामुळे श्रीराम नवमी निमित्त माजलगाव शहर व तालुक्यातील मांस विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावीत असे निवेदन बजरंग दल चे संयोजक मा. मनोज प्रशांत कोरडे यांनी माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांना दिले यावेळी पो. नि. केतन राठोड सरानी सुध्दा या गोष्टी ची तात्काळ अमलबजावणी करतो म्हणत आजच सर्व मास विक्रेत्याना बोलवून घेऊन दि. 16 पासुन ते दि.17  पर्यंत मास विक्री चे  दुकान बंद ठेवण्यात येतील असे आश्वासन दिले.यावेळी बजरंग दल चे मनोज कोरडे, विलास नाना भाऊ शिंदे, सचिन शेजूळ, मेघराज नावडकर,  मारोती चिचोलकर आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा