माजलगाव शासकीय गोदामात चालतो गलथान कारभार




गोदाम किपर हजर नसताना खासगी लोकांवर चालतो. गोदामाचा कारभार.

वर्षानुवर्षे गोदाम किपर हे लावतात या माध्यमातून स्वस्त धान्याची विल्हेवाट.

पात्रुड प्रतिनिधी दि:19/05/माजलगाव शासकीय गोदाम मध्ये चालतो गलथान, व भोंगळ कारभार याकडे तहसीलदार, तालुका पुरवठा. विभागाचे आर्थिक व्यवहारातून होते दुर्लक्ष व काळ्याबाजारात जातो रिक्षा, टेम्पो, पिकप, ट्रक,ने माल या प्रकरणी रिपब्लिकन पार्टीचे अल्पसंख्यांकांचे बीड जिल्हा सरचिटणीस नईम करीम आत्तार यांनी. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, यांच्याकडे पुराव्यासह चौकशी करून दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी चे वेतन बंद करून त्यांच्या निलंबना साठि. केले राहत्या घरी पात्रुड याठिकाणी बेमुदत आमरण उपोषण सुरू.
वारंवार तक्रारी बरेचशा लोकांच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारीची निरसन करत नसतात तीन-तीन महिने तक्रारीची उत्तर दिल्या जात नाही परस्पर वरिष्ठांकडे अहवाल मात्र खोटा सादर करतात. तहसीलदार मॅडम कुठल्याही प्रकारची दखल घेत नसतात कार्यवाही करण्याच्या ऐवजी सुनावणी ठेवली म्हणतात व आंदोलनकर्त्यांना दबाव टाकण्याचे काम करण्याचा प्रयत्न करतात शासकीय गोदामांमध्ये वर्षानुवर्षे कार्यरत असणारे गोदाम रक्षकच बनले भक्षक हे गोदाम किपर मनमानी कारभार करत गोदाम ठिकाणी हजर न राहता करतात शासनाची दिशाभूल खासगीवव्यक्ती कडून कामे करतात. तसेच खासगी वाहनांच्या व खाजगी लोकांच्या माध्यमातून स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विल्हेवाट लावतात. अशा अनेक बाबींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून.त्यांचे वेतन बंद करून त्यांच्या निलंबनाच्या मागणी साठि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बीड जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक चे नयुम आतार यांनी राहत्या घरी पात्रुड येथे केले उपोषण सुरू जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा घेतला पवित्रा.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा