अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.च्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यु




अन्टीजेन टेस्ट करून प्रेताची विल्हेवाट ;सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ! विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे तक्रार.
पाटोदा !
तालुक्यातील अंमळनेर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात अन्टीजेन तपासणीसाठी आलेल्या वृद्धाचा वैद्यकीय आधिका-यांनी तपासणी न केल्यामुळे व्हरांड्यातच मृत्यु झाला असून मयताची अन्टीजेन तपासणी करून प्रेताची विल्हेवाट लावण्यात आली संबधित प्रकरणात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड, पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त यांना केली आहे.
दि.18 मे मंगळवार रोजी सकाळी उत्तम किसन शेळके वय 80 वर्षे रा. चंद्रवाडी ता. पाटोदा जि.बीड येथिल किराणा दुकनदार अन्टीजेन तपासणी करण्यासाठी अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते, तेथील वैद्यकीय आधिकारी डाॅ.शेख यांनी त्यांना व्हारांड्यात बाकड्यावर बसण्यास सांगितले, व गप्पा मारत बसले, बाहेर बाकावरच उत्तम किसन शेळके यांचा मृत्यु झाला तरी सुद्धा दोन तास मृतदेह बाकावरच पडुन होता, डाॅ.शेख यांनी काहीच हालचाल केली नाही, त्यानंतर अंमळनेर येथिल व्यापारी महादेव पोकळे आण्णा यांनी अंमळनेरचे सरपंच उद्धव पवार यांना फोनवरून माहिती दिली, त्यानंतर सरपंचांनी अंमळनेर पोलीस ठाण्याचे प्रमुख शामकुमार डोंगरे यांना कल्पना दिली, डोंगरेंनी डाॅ.शेख यांची कानउघडणी केल्यानंतर अन्टीजेन तपासणी करण्यात येऊन प्रेताची विल्हेवाट लावण्यात आली.

डाॅ.शेख यांच्या हलगर्जीपणामुळेच लवकर तपासणी न केल्यानेच मृत्यु:- विशाल/आबासाहेब पोकळे
अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकारी डाॅ.शेख यांनी तात्काळ अन्टीजेन तपासणी करून उपचार न केल्यामुळेच उत्तम शेळके यांचा उपचाराअभावी मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईक विशाल पोकळे, आबासाहेब पोकळे यांनी केला आहे.

डाॅ.शेख यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा व डाॅ.तांदळे यांच्यावर प्रकरण दडपल्याप्रकरणी प्रशासकीय कारवाई करण्यात यावी:- डाॅ.गणेश ढवळे
_ अन्टीजेन तपासणी करण्यासाठी आलेल्या उत्तम शेळके यांची डाॅ.शेख यांनी हलगर्जीपणामुळेच तपासणी न करण्यात येऊन उपचाराअभावी मृत्यु झाल्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याप्रकरणात तालुका आरोग्य आधिकारी डाॅ.तांदळे यांनी प्रकरण दडपतल्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे यांनी केली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा