डाक्तर हात लावतंय म्हणल्यावर आपल्याला घोर नाही




 

गरीब रुग्णाना मोफत सेवा देऊन; माणसांत देव पाहणारे डाॅ.गणेश ढवळे 

बीड । लिंबागणेश पंचक्रोशीतील गावांतील विविध गावामध्ये विनामूल्य आरोग्य सेवा देण्याच्या आज पिंपरनई गावांतील निराधार महिलेजवळ महिनाभरापासून कोरोनाच्या भितीमुळे दुर राहणारी बायामाणसं आज मी सखुबाइ बापुराव वायभट वय 80 ,महिनाभरापासून जवळ न जाणा-या बायामाणसं डाक्तर जवळुन तपासतंय म्णल्यावर महिनाभरापासून आंघोळ न घातलेल्या सखबाईंना ऊद्या सकाळी गरम पाण्याने आंघोळ घालुया म्हणत त्यांच्या मनातील भिती दुर झाली. यावेळी सरपंच बाळासाहेब वायभट, बाळुशेट वायभट, सुनिल भोसले आदि. हजर होते.

बीड तालुक्यातील पिंपरनई येथे विनामूल्य आरोग्य सेवा शिबिरात सेवा देण्यासाठी गेले असता त्याठिकाणी एका पडक्या घरातील अंगणात सखुबाई बापुराव वायभट वयोवृद्ध आजी होत्या, महिनाभरापुर्वी गावात 6-7 लोकांचा कोरोनाने मृत्यु झाल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले होते, त्यामुळे आजारी पडलेल्या सखुबाईच्या वाड्यात जायला लोकं भित असतं, जेवण, पाणी लांबुनच देत असत, 20 दिवसापूर्वी सरपंच बाळासाहेब वायभट यांनी बीड वरून सरकारी रूग्णवाहीका बोलावुन त्यांना बीड जिल्हारूग्णालयात दाखल केले त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या, 6 दिवसानंतर त्यांना घरी सुट्टी देण्यात आली, परंतु अशक्तपणा असल्याने स्वतःचे जेवण तयार करू शकत नव्हत्या, त्यांना शेजारील बायामाणसं लांबूनच जेवण, पाणी द्यायचे, महिनाभरापासून आंघोळ केलेली नव्हती, आज विनामूल्य आरोग्य सेवा अंतर्गत गावात गेले असता बाळूशेठ वायभट यांनी ही माहिती सांगितल्यानंतर मी त्या आजींची तपासणी केली सलाईन औषधोपचार सुरू केले, त्यानंतर त्याठीकाणी जमलेल्या महिलांनी डाक्तर हात लावतंय म्हणल्यावर घाबरायचं काम नाही म्हणत उद्या सकाळी गरम पाण्याने आंघोळ घालु म्हणत भिती दुर झाली म्हणाल्या.

कोरोनाविषयी जनजागृती करून भिती दुर करणे हाच मुळ उद्देश्य यशस्वी:- डाॅ.गणेश ढवळे
ग्रामिण भागातील माणसं कोरोना आजाराविषयी संपुर्ण ज्ञान नसल्यामुळेच गैरसमज पसरत आहेत, ती भिती दुर करणे हा मुळ उद्देश आरोग्य सेवा शिबिराचा पुर्ण होत आहे याचे समाधान, याकामी सरपंच बाळासाहेब वायभट, बाळशेठ वायभट, सुनिल भोसले यांनीही प्रयत्न केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा