शेतक-याने अज्ञानापोटी बिब्वा घातला; बैलाचा डोळा काढायची वेळ आली




 

पशुवैद्यकीय आधिका-याच्या सल्ल्याने उपचार करणे गरजेचे – डाॅ.गणेश ढवळे
ग्रामिण भागातील शेतकरी पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांचा उपचार करण्यापेक्षा खाजगी उपचारास प्राधान्य देतात आणि कधीकधी हि गोष्ट अंगलट येताना दिसून येते. मौजे मुळुकवाडी ता.जि.बीड येथील शेतकरी ज्ञानदेव रामभाऊ ढास यांच्या बैलाला आजार असल्याने त्यांनी झालेल्या जखमेवर बिब्वा घातला त्यामुळेच त्याला जंतुसंसर्ग होऊन गाठ तयार झाली शेवटी आज ती गाठ व डोळा काढावा लागला .

अमोल मोहळकर, पशुवैद्यकीय आधिकारी यांनी केली शस्त्रक्रिया ।

लिंबागणेश येथिल पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय आधिकारी अमोल मोहळकर यांनी एक्सक्रिप्शन ऑफ अबसेस करून झालेल्या जखमेतील रक्याच्या साकाळलेल्या गाठी काढून जंतुसंसर्ग झालेला डोळा सुद्धा काढावा लागला या शस्त्रक्रियेत त्यांना वर्णोपचारक विक्रम भोसले, पशुधन पर्यवेक्षक गणेश भोसले यांनी सहाय्य केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा