बीड महाज्योती संस्थेला मिळालेले सव्वाशे कोटी सरकारला गेले परत
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाज्योती संस्थेतील त्रुटी दूर करा ; विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी- खा.प्रितमताई मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांनकडे मागणी

बीड। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील ( महाज्योती ) अधिकाऱ्यांच्या उदासीन कारभारामुळे संस्थेला मिळालेले सव्वाशे कोटी रुपये खर्चाअभावी शासनाकडे परत गेले आहेत.अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे मिळालेला निधी परत गेला आहे परंतु यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित राहू नयेत म्हणून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.संस्थेतील त्रुटी दूर करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे . राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सारथी आणि बार्टी या संस्थांच्या धर्तीवर महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आल्यानंतर मागील वर्षी एकशे पंचावन्न कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्याने केली होती.परंतु अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे हा निधी शासनाकडे परत गेला.तर प्राप्त झालेला एकतीस कोटी निधी देखील संस्थेला खर्च करता आला नाही.यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.संस्थेच्या या अनागोंदीमुळे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे . यासंदर्भात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना साद घातली आहे.महाज्योती संस्थेमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न व्हावेत , विद्यार्थ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा