विना परवानगी बांधकाम करणार्‍या संस्थेवर कारवाई
परभणी :  येथील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र अपंग शिक्षण संस्थेने परभणी महानगरपालिकेकडून बांधकामाची रीतसर परवानगी न घेता बांधकाम सुरू केल्याप्रकरणी शहरातील नवा मोंढा पोलीस स्टेशन येथे संबंधित संस्थाचालकांवर मनपाने गुन्हा दाखल केला आहे.

परभणी महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागाचे कर्मचारी न्यायरत्न घुगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की परभणी एमआयडीसी परिसरात असलेल्या महाराष्ट्र अपंग शिक्षण संस्थेने बांधकाम कर चुकवण्याच्या उद्देशाने मनपाकडे रीतसर परवानगी न घेता बांधकाम सुरू करून शासनाची दिशाभूल करत महसूल चोरी केला आहे. या अनाधिकृत बांधकामाची तक्रार दाखल झाल्यानंतर प्रभाग समिती प्रमुख, नगररचनाकार व अन्य संबंधित अधिकार्यांनी जागेवर जाऊन पंचनामा केला असता नमूद नकाशा पेक्षा आधीकचे बांधकाम करून शासनाची दिशाभूल केल्याचे लक्षात आले. याबाबत संबंधित संस्थाचालकाला वारंवार सूचना देऊनही महाराष्ट्र अपंग शिक्षण संस्थेच्या संस्थाध्यक्षांनी मनपाच्या आदेशाला केराचीटोपली दाखवत मनमानी पद्धतीने बांधकाम करून मनपाच्या बांधकाम नियमक निकष व नियमावलीचे उल्लंघन केले आहे. मनपाच्या नगरविकास विभागाकडून मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार संबंधित संस्था चालकावर कारवाई करण्याचे प्रस्तावित केल्यानंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 नुसार कलम 52  अंतर्गत संस्था अध्यक्षांवर नवा मोंढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि रामेश्वर तट करत आहेत.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा