गरीबों की दुआ लगेगी! नेक काम कर रहे है!! यातच समाधान – डाॅ.गणेश ढवळे 
डोंगरघाटातील वनविभागातील मजुरांना विनामूल्य औषधोपचार ।

बीड। बालाघाटावरील पिंपरनई, फुकेवाडी आदि डोंगरघाटातील वनविभागातील मुंबई रहिवासी अंबाजोगाई येथील व पोटापाण्यासाठी बीड तालुक्यातील डोंगरपट्ट्यात पालावरील मजुरांची विनामूल्य आरोग्य शिबिरात तपासणी व औषधोपचार करण्यात आले.

बीड तालुक्यातील पिंपरनई, फुकेवाडी शिवारातील गेल्या दिवाळीपासून पालं ठोकून राहणा-या मुळ अंबाजोगाई येथील रहिवासी असणारी महिलापुरूष मंडळी वनविभागातील “पाणी अडवा-पाणी जिरवा “या शासकीय उपक्रमा अंतर्गत झाडांना खड्डे खोदणे, माती लावणे,चर खोदणे आदि कामे करतात, आज 22 मे शनिवार रोजी सायंकाळी तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

गरीबों की दुआ लगेगी, :-पालावरील मजुर भगिनी

पालावरील वनविभागातील मजुरांची तपासणी केल्यानंतर महिलांनी इन कोरोना की बिमारी के दिनों मे आप नेक काम कर रहे है, गरीबों की दुआ लगेगी म्हणत आशिर्वाद दिले. हेच आशिर्वाद लाख मोलाचे आणि समाधान देणारे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा