वाढदिवसाचा खर्च आयसोलेशनमधील रूग्णांना देऊन जपली सामाजिक बांधिलकी
 

महादेव इटके यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या सेंटरला दिली रक्कम

परळी ।
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा व तेवढाच महत्वाचा क्षण असतो. परंतू राज्यातील गंभीर झालेली कोरोना परिस्थिती, वाढत चाललेले रूग्ण आणि त्यांच्या सेवार्थ काम करणारी मंडळी यांचे समर्पित जीवन लक्षात घेवून महाराष्ट्र वीरशैव महासभेचे तालुकाध्यक्ष तथा भाजपाचे शहर उपाध्यक्ष महादेव इटके यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या कोविड आयसोलेशन सेंटरसाठी समर्पित केला आहे. रूपये 11 हजार एका धनादेशाद्वारे त्यांनी आज दिले आहेत.
महाराष्ट्र वीरशैव महासभेचे तालुकाध्यक्ष तथा भाजपाचे शहर उपाध्यक्ष महादेव इटके यांचा 22 मे रोजी म्हणजेच आज वाढदिवस होता. नेहमीप्रमाणे आगळे वेगळे उपक्रम राबविण्यावर महादेव इटके आणि त्यांच्या मित्र परिवाराचा भर असतो. परंतू परळी शहर आणि तालुक्यात कोरोना रूग्णांची वाढत चाललेली संख्या आणि या आजाराचे गांभिर्य लक्षात घेवून महादेव इटके यांनी अक्षदा मंगल कार्यालयात असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या आयसोलेशन सेंटरसाठी तेथील एक दिवसाचा खर्च समर्पित भावनेने भाजपाचे शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहीया यांच्याकडे प्रदान केला आहे. आयसोलेशन सेंटरमध्ये सकाळचा काढा, नाष्टा, आणि एक वेळच्या जेवणाचा खर्च महादेव इटके यांनी उचलला. रूपये 11 हजार एवढा निधी त्यांनी आज दिला आहे. या समर्पित भावनेबद्दल महादेव इटके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, जवाहर शिक्षण संस्थेचे सदस्य श्रीराम मुंडे, भाजपा सरचिटणीस उमेश खाडे, राजेंद्र ओझा, प्रदीप कुलकर्णी, योगेश पांडकर, अनिश अग्रवाल, गोविंद चौरे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा