धारूर कृ.ऊ.बा.स.चे सभापती- महादेव बडे यांचे दुःखद निधन
महादेव बडे प्रामाणिक राजामाणूस ।

महादेवराव बडे डोंगर पट्ट्यातील प्रामाणिक राजा म्हणून ओळखल्या जायचं साधाभोळा व्यक्तिमत्व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या वर जीवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता . मागच्यावेळी भूगोल वाडी जिल्हा परिषद सर्कल मधून उमेदवारी देण्यात आली चांगल्या मतांनी निवडून आले . त्यांच्या कार्याची ओळख म्हणजे दिलदार मनाचा राजा त्याच्यानंतर उस्तोड कामगाराची मुकदम म्हणुन सेवा करण्याची त्याची हातोटी फार चांगली होती . लोकांमध्ये बोलणं काम करणे मनमोकळा स्वभाव पंकजाताई च्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रीतम ताई च्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर त्यांनी डोंगर पट्ट्यात पक्षासाठी चांगलं काम केलं . कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणूनही त्यांचा नावलौकिक राहिला गट तट न करता आपलं नेतृत्व आपला पक्ष ही त्यांच्या मनाची ओळख . वर्तमान संकटात नियत कुणावर घाला घाल ते खूप अवघड आहे . बडे गेल्याच वृत्त कळालं खूप मोठा धक्का सहन न होणे पलीकडचं हे दुःख आहे . तेलगाव धारूर वडवणी पंचक्रोशीत त्यांची ओळख गोरगरिबांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून कासारी बोडका गावचा सरपंच पद त्यांनी सांभाळणं . चांगली माणसं खरं तर समाजात आसायला हवी पण परमेश्वर असं का करतो? हेच कळत नाही त्यांच्या जाण्याने पक्षाचं प्रचंड नुकसान झालं भरून निघू शकत नाही . त्यापेक्षा अधिक पंकजाताईच्या खासदार ताईच्या नेतृत्वासाठी जीवापाड संघर्ष करणारा डोंगर पट्ट्यातील कार्यकर्ता गेला हे प्रचंड नुकसान आहे . महादेवराव यांची ओळख त्या भागात गोर गरीबाचा देव म्हणून अशी आहे . हसतमुख चेहरा शांत स्वभाव अनेक असे पैलू त्यांच्या स्वभावाचे होते . पदाचा कुठलाही गर्व नाही आपल्या पदाची खुर्ची आपली नसते त्यावर सर्वसामान्य लोकांचा हक्क असतो ही ओळख त्यांनी दाखवून दिली . त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती बळ देवो. त्यांच्या दुःखात दै. मराठवाडा पत्र सहभागी आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा