बीडच्या दोन कोरोना केअर सेंटरला अँड. अजित देशमुख यांनी दिली भेट
 

– रुग्णांशी साधला संवाद

बीड l बीड शहरातील विधी महाविद्यालय परिसरातील दोन कोरोना केअर सेंटर मध्ये नगर पालिका वेळेत पाणी पुरवत नाही, अशी तक्रार होती. त्यामुळे या दोन्ही केंद्रांना आज सकाळी नऊच्या दरम्यान अँड. अजित देशमुख यांनी भेटी दिल्या. भेटी दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नरेश कासट यांनी देखील नगर पालिका कर्मचाऱ्यांना पाण्यासंदर्भात सूचना देऊन मुख्याधिकारी यांनासुद्धा ही बाब कळवली. यावेळी येथे असलेल्या दोनशे वीस रुग्णांच्या रुम पाहून रुग्णांशी त्यांनी संवाद साधला.

या ठिकाणच्या रुग्णांच्या आरोग्य खात्याचे कर्मचारी यांच्या बाबतीत कुठलीही तक्रार नाही. त्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या जेवना बाबत देखील कुठलीही तक्रार नाही. मात्र नगर पालिकाच्या पाणी आणि स्वच्छते संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी अँड. देशमुख संवाद साधला.

आज येथील सर्व स्टाफ कामावर हजर होता. डॉक्टर आणि नर्सेस आणि कर्मचारी प्रामाणिकपणे आपापल्या कामात असल्याचे दिसून आले. यावेळी संवाद साधताना रुग्णांच्या आरोग्या बाबतची देखील चौकशी करण्यात आली. काही रुग्णांच्या तपासण्या करून त्यांच्या तब्येती कशा आहेत ? हे देखील पाहण्यात आले.

जिल्ह्यात काही ठिकाणी रुग्ण संख्या जास्त असल्याने आणि सेंटरची ज्या ठिकाणी उभारणी करण्यात आली, त्या इमारती, शाळा, महाविद्यालयाच्या असल्याने थोडीफार गैरसोय होते. या लहान मोठ्या गोष्टींकडे पेशंटने न पाहता त्या ठिकाणी आपली काळजी स्वतः शांत राहणे आवश्यक आहे. कारण या सर्व इमारती दवाखान्याच्या नाहीत. त्यामुळे शाळा – महाविद्यालयांच्या इमारतीमध्ये सर्व सुविधा घरच्यासारखे मिळणे देखील शक्य होत नाही.

आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या सेवा चांगल्या बजावत असताना प्रत्येक रुग्णांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या पासून कसलाही त्रास होणार नाही, रुग्ण केअर सेंटरच्या बाहेर पडल्यामुळे या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांची बोलणी खावी लागतात. त्यामुळे आपला त्रास होऊ नये, याची दक्षता प्रत्येक रुग्णाने घेणे आवश्यक आहे. केअर सेंटर मध्ये असलेल्या रुग्णाने आपल्या बेडवरच आराम करायला हवा. हे देखील प्रत्येक रुग्णाने पहावे, असेही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा