कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाने उचलले टोकाचे पाऊल




 

पुणे : दौंड तालुक्यातील पाटस येथील अल्पवयीन मुलगी आणि नानविज येथील 25 वर्षीय तरुण यांनी एकत्र विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हते. त्यामुळे दोघांनी संतापात विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोघांनी दौंड तालुक्यातील कुसगाव येथील जंगलात विष प्राशन करुन स्वत:चे आयुष्य संपवले. या घटनेमुळे आजूबाजूच्या गावांत एकच खळबळ उडाली आहे. या प्रेमी युगुलाच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

या घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी सविस्तर माहिती दिली. “मी ड्युटीवर जात असताना मला कुसेगावच्या पोलीस पाटलांचा फोन आला. त्यांनी मला सुपेघाट येथे एक मुलगा आणि मुलीने विष प्राशान करुन आत्महत्येचा प्रयत्न केलाय, अशी माहिती दिली. तसेच मला तात्काळ घटनास्थळी या, असे सांगितले. त्यानंतर मी आणि आमचे पोलीस नाईक चव्हाण तातडीने घटनास्थळी गेलो. तिथे आम्ही रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णालयात नेवून वाचवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण उपचारादरम्यान दौघांचा मृत्यू झाला. मुलाचे वय 25 वर्षे इतके होते. त्याचे नाव क्षीरसागर होते तर मुलगी केवळ 16 वर्षांची होती. त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. घरातील लोकांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.”

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा