मेटे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत – गणेश बजगुडे पाटील




मराठा आरक्षणाच्या विनायक मेटेंच्या भूमिकेला शिवक्रांती संघटनेचा विरोध अासुन मेटे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत – गणेश बजगुडे पाटील
“०३ जुन रोजी राज्यातील सर्व मराठा समन्वयक, याचिकाकर्ते, विधितज्ञ, मराठा आरक्षण आभ्यासक यांची बीड येथे घेणार चिंतन बैठक”
बीड ।

तत्कालीन राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांत स्वतंत्र ews चे १६ टक्के आरक्षण दिले होते परंतु दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने ०५ मे २०२१ रोजी दिलेल्या निकालात ५० टक्केच्या वर आरक्षण देता येणार नाही म्हणत मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले व त्यानंतर पुन्हा मराठा समाज व मराठा संघटना आंदोलनाच्या भूमिकेत एकत्रित येत आहेत. परंतु मराठा आरक्षण कुठल्या मुद्द्यावर रद्द झाले “मराठा समाज मागास आहे व समाजाला आरक्षणाची गरज आहे” हे कोर्टाला का पुराव्यासह पटवून देता आले नाही. व आता आरक्षण मिळवायचे असेल तर पुढे काय भूमिका घेतली पाहिजे, कश्या पद्धतीने कुठल्या मार्गाने ही आरक्षणाची लढाई लढलो पाहिजे या मुद्द्यावर ओहापोह सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही बीड येथे ०३ जून २०२१ रोजी मराठा समाजातील जाणकार आभ्यासु तज्ञांच्या उपस्थितीत चिंतन बैठकीचे आयोजन करून पुढील दिशा ठरवणार आहोत. बरीच मंडळी आज आरक्षण कसे व कोणाला मागायचे या भ्रमात आसताना काही मंडळी मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सवई प्रमाणे समाजाला वेठीस धरून दिशाहीन करण्याचे काम करत आहेत. कोरोना सारखे भयंकर संकट ओढवले असताना महाराष्ट्रात बीड जिल्हा हा दोन नंबरला कोरोना पॉजीटीव्ह जिल्हा असताना दररोज बेड व ऑक्सीजन कमतरता निर्माण होत आहे. उपचारा अभावी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आशा परिस्थितीत समाजाला वेठीस धरून मोर्चा काढणे कितपत योग्य आहे. मोर्चातून काय साध्य करायचे आहे. समाजातील लोकांना कोरोनाची बाधा झाली तर कोण जबाबदार आहे. आंदोलनाचे आनेक प्रकार आहेत. बछू कडु सारखा आमदार एकटा स्वतः ला मातीत पुरून घेतो व सरकारच्या विरोधात आंदोलन करतो तर मेटेहे हे राजकीय स्वार्थापोटी गर्दी गोळा करून समाजाला मातीत घालण्याचे काम करत आहेत. एकीकडे छत्रपती संभाजी महाराज वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा आरक्षण संघर्ष समिती, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती समाजातील सर्व संघटना यांना विरोध करून नेहमीच आपली वेगळी चूल मांडण्याचे काम यांनी केले आहे. मराठा समाजाच्या सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचा विरोध असताना मोर्चाने प्रश्न सुटणार आसतील तर मराठा क्रांती मोर्चाच्या छत्राखाली कुणाचेही नेतृत्व नसताना लाखोंची मोर्चे निघाली काय साध्य झाले क्रांती मोर्चाची एक ही मागणी मान्य झाली नाही. आमच्या कोपर्डीच्या बहिणीला न्याय देता आला नाही याचे दुःख आजही आमच्या हृदयात आहे. आमचा मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध नाही परंतु वेळ, परिस्थिती व भूमिकेला विरोध आहे. समाजाच्या मागण्यासाठी असलेले आंदोलन हे अराजकीय अासले पाहिजे. मराठा आरक्षणाची मागणी ही केंद्र व राज्य सरकारकडे करावी लागेल. “आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे लागेल तरच ते टिकेल” यासाठी केंद्राकडे असलेले प्रलंबित विधेयक मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवावे लागेल त्याकरता केंद्र सरकारलाही जाब विचारावा लागेल. केंद्राच्या विरोधात बील पास करण्यासाठी आंदोलने करावी लागतील परंतु विनायक मेटे समाजाची दिशाभूल करत आहेत. विनायक मेटे हे भाजप समितीचे सदस्य आहेत त्यांनी राजीनामा देवून समाज म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात समाज म्हणून सोबत यावं आम्ही त्यांचे स्वागत करू. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाची दिशाभूल करण्याचे काम कराल तर विनायक मेटेच काय कोणालाही विरोध करण्याची भूमिका आमची आसेल. यापुढे मराठा समाजाच्या भावनाशी खेळण्याचा किंवा डीवचण्याचा कोणी प्रयत्न करत आसेल तर त्याची गाय केली जाणार नाही. समाजाचे खरे विरोधक कोण आहेत हे आता समाजापुढे आले पाहिजेत त्यांचा कुटील डाव समाजाने हाणून पाडला पाहिजे म्हणुन आम्ही समाजजागृती करण्यासाठी बीड मध्ये समाजातील प्रमुख लोकांच्या उपस्थितीत राज्यातील पहिली चिंतन बैठक आयोजित करत आहोत. या बैठकीस राज्यातील मराठा आरक्षण याचिकाकर्ते, कायदेतज्ञ, अभ्यासक उपस्थित राहणार आसुन सर्वांच्या चर्चेतून आमची पुढील दिशा व भूमिका ठरवली जाईल.

मराठा समाजाच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही, आंदोलन करावीच लागतील परंतु त्यासाठी भूमिका स्पष्ट समाजाच्या हिताची आसावी समाजाला फसवणारी नसावी. आमची मागणी आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे ही आसेल तरच आरक्षण टिकेल. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे बील राज्यसभा व लोकसभेत प्रलंबित अासुन त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागेल असे नकरता विनायक मेटे मोर्चा काढून समाजाची पुन्हा दिशाभूल करत आहेत. त्याच बरोबर राज्यात दोन नंबरला कोरोना रुग्ण बीड जिल्ह्यात आहेत. उपचारा अभावी मृतांचे प्रमाण रोज वाढत आहे अाश्या परिस्थितीत आंदोलनाची आणेक मार्ग आसताना मोर्चा काढणे योग्य नाही असे गणेश बजगुडे पाटील म्हणाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा