शेरकर दाम्पत्याच्या सामाजिक कार्याला बळकटी देणार -धनंजय मुंंडे
परळी । समाजातील वाढत्या व्यसनाधिनेतेला आळा घालण्यासाठी मागीऊ अनेक वर्षांपासून व आता नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र बीड च्या माध्यमातून अनेक बांधवांना शेरकर दाम्पत्यं काम करत आहे. समाजात वाढते व्यसनाचे प्रमाण उध्वस्त,बराबाद होत असलेले संसार पुन्हा पुनर्वसन करण्यासाठी त्यांचं सुरू असलेलं हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांनी केले व त्यांच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या.परळीत करोनाचे नियम पाळुन शासकीय विश्रामगृहात झालेल्या छोटेखानी मार्गदर्शक बैठकीत ते बोलत होते. डॉ राजकुमार गवळे,प्रा अंजली ताई पाटील यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली बीड येथे नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र बीड येथे सुरू आहे . समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन औषधोपचार,योग, प्राणायाम आदींच्या माध्यमातून व्यसनमुक्तीच्या बीड येथे ते चांगले काम करत आहेत आपण नक्कीच शासन व वैयक्तिक पातळीवर त्यांना बळ देऊ असे आश्वासनहि त्यांनी दिले.या वेळी परळीचे बाजीराव भैय्या धर्माधिकारी,वाल्मीक अन्ना कराड, धनंजय शिंदे,संगपाल कांबळे ओम डोलारे हे उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा